"सखे तू "
तुझ्या गुलाबी ओठांवर ओठ माझे
टेकताच, तू अलगद डोळे बंद करायचीस. अन माझ्या ओठांच्या मिठीत तू, ओठांबरोबर स्वत:ही हरवायचीस.
मधेच माझ्या ओठांतून तू,
ओठ तुझे सोडवायचीस.
अन लाजाळू सारखी लाजत हलकेच मान खाली घालायचीस.
लाजेने खाली गेलेली मान तुझी, मी हळूच वर उचलायचो.
अन् तुझ्या डोळ्यांवर आलेले ते केस बोटांनी हलकेच मागे सारायचो.
माझ्या नजरेला नजर देताना तू, सखे किती ग बावरायचीस. क्षणाचाही विलंब न करता तू, माझ्या मिठीत शिरायचीस.
No comments:
Post a Comment