ओल्या सांजवेळी उन्हे सावलीस बिलगावी
तशी तू जवळी ये जरा
तशी तू हलके बोलना
आभाळ खाली झुके पावलांखाली धुके - २
सुख हे नवे सलगी करे का सांगना
ओल्या सांजवेळी उन्हे सावलीस बिलगावी
तशी तू जवळी ये जरा
सारे जुने दुवे जळती जसे दिवे
पाण्यावरी जरा सोडून देना
माझी हि आर्जवे पसरून काजवे
जातील या नव्या वाटेवरी तुझ्या
रस्ता नवा शोधू जरा हातात हात दे
पुसुया जुन्या पाउलखुणा सोबत तुझी साथ दे
ओल्या सांजवेळी उन्हे सावलीस बिलगावी
तशी तू जवळी ये जरा
वळणावरी तुझ्या पाउस मी उभा
ओंजळ तुझी पुन्हा वाहून जाऊ दे
डोळ्यातल्या सारी विसरून ये घरी
ओळख आता खरी होऊन जाऊ दे
सांभाळ तू माझे मला माझ्या नव्या फुला
मी सावली होऊन तुझी देईन साथ हि तुला
No comments:
Post a Comment