पावसात भिजताना
तूच येतोस जणू जवळ
तूही असाच ओढतोस मिठीत
अगदी जवळ अगदी जवळ
अंगाखांद्यावर हात त्याचे
कधी रेशीम कधी लागट
तूही कधी मित्र असतोस
कधी घुसळण अति चावट
बास आता म्हणूनही
तुमचा जोर संपत नाही
चिंब भिजण्याचे क्षण
किती दिवस आठवत राही
येणार येणार वाट पहात
तुम्ही दोघं येत नाही
आलात तर असे जोरात
तड तड जशी लाही
पाऊस पडून गेल्यावर
कसं छान मोकळं होतं
तू भेटून गेल्यावरही
तसंच काहीसं होतं....
No comments:
Post a Comment