NiKi

NiKi

Tuesday, May 21, 2013

कधी कधी असाच एकांतात
तुझी आठवण करत
तुझी कल्पना करत राहतो
कल्पनेच्या महासागरात असाच डुंबत राहतो
तरीही थांग लागत नाही की
तु आहेस तरी कोण...
असे वाटते तुझ्या खोल खोल डोळ्यांत
स्वतःला झोकून द्यावे
क्षणाभारसाठी सर्व विसरून ह्या
देहापासूनच वेगळे व्हावे
खुपदा प्रयत्न केला तरी
अजूनही कळत नाही की
तु आहेस तरी कोण...
आज पर्यंत कितीतरी जण
आयुष्यात आले आणि कितीतरी परत गेले
पण तु नसताना क्षणभरासाठीही
तुझी आठवण मनातून जात नाही
माझे तर सोड ह्या मनालाही उमगत नाही की
तु आहेस तरी कोण...
चौर्याऐशी योनींतून मानव म्हणून जन्मलो
कुणास ठाऊक किती वेळा जगलो मेलो
हेही शोधायला असेल सोपे पण
सर्वथा कठीण वाटते जाणणे की
तु आहेस तरी कोण...
तु कधी स्वताकडे पाहा एकदा
म्हणजे तुला पटेल माझे म्हणणे
की एकमेकांवाचून अपूर्ण आहे आपले जगणे
साद घालतोय मी तुला आता तूच सांग मला की
तु आहेस तरी कोण...
तु आहेस तरी कोण...

No comments:

Post a Comment