अशी सांज येते,
तशी ती जाते.
जाता जाता लवलवत्या पापण्यांनी
माझ्या हृदयाची कंपने वाढवते .
अशी सांज येते,
भास्करा क्षितिजा पार घेऊन जाते.
तो जाता जाता ती त्याच्या किरणात न्हाऊन निघते .
तिच्या पाठमोऱ्या सावलीकडे मी पाहतो,
तिने पुन्हा फिरून माघे यावे ,
मला बिलगावे अशी आस धरून बसतो.
अशी सांज येते ,
वेळ पुन्हा कातर ,कातर होते.
तिचे हि पाऊल पावलात घुटमळते .
मागे वळून तिची नजर मला शोधत राहते .
मी दिसता तशी ती धावत येते ,
नाजराला नजर भिडते.
आमच्या श्वासाची घालमेल ,
त्या सांजेला ला कळते .
अशी सांज येते ,
ती माझ्या मिठीत असते ,
शब्दांना जागा नसते ,
मात्र अश्रूंना वाट मिळते .
ओघळता तिचे अश्रू ,
ती सांज हि रडते ,
म्हणून कदाचित ती पावसाला हाक मारते .
तो गडगडून येतो ,
सार काही भिजून टाकतो .
मी मात्र तिच्या डोळ्यातल्या काळ्या ढगाकडे बघता ओलाचिंब होतो.
तशी ती जाते.
जाता जाता लवलवत्या पापण्यांनी
माझ्या हृदयाची कंपने वाढवते .
अशी सांज येते,
भास्करा क्षितिजा पार घेऊन जाते.
तो जाता जाता ती त्याच्या किरणात न्हाऊन निघते .
तिच्या पाठमोऱ्या सावलीकडे मी पाहतो,
तिने पुन्हा फिरून माघे यावे ,
मला बिलगावे अशी आस धरून बसतो.
अशी सांज येते ,
वेळ पुन्हा कातर ,कातर होते.
तिचे हि पाऊल पावलात घुटमळते .
मागे वळून तिची नजर मला शोधत राहते .
मी दिसता तशी ती धावत येते ,
नाजराला नजर भिडते.
आमच्या श्वासाची घालमेल ,
त्या सांजेला ला कळते .
अशी सांज येते ,
ती माझ्या मिठीत असते ,
शब्दांना जागा नसते ,
मात्र अश्रूंना वाट मिळते .
ओघळता तिचे अश्रू ,
ती सांज हि रडते ,
म्हणून कदाचित ती पावसाला हाक मारते .
तो गडगडून येतो ,
सार काही भिजून टाकतो .
मी मात्र तिच्या डोळ्यातल्या काळ्या ढगाकडे बघता ओलाचिंब होतो.
No comments:
Post a Comment