NiKi

NiKi

Tuesday, May 21, 2013

तू भेटलीस जेव्हा
त्या जादूभरल्या क्षणांची
प्रिये याद येते
तुझ्या मिटल्या लोचनांची

याद येते मज
बरसात अनोळखी ती
अन जी स्पर्शिली मी
नक्षी तुझ्या बटांची

श्वास रोखून धरते
याद तुझ्या स्पर्शाची
ओढ मनी जागते
त्या बेधुंद मिठीची

तो वारा भरारा
ती धार श्रावणसरीची
अनुभवले सत्यात तेव्हा
याद त्या सा-या स्वप्नक्षणांची

चिंब आसमंत सारा
चिंब भावनांचा पसारा
याद छळते मजला
डोळा दाटल्या थेंबांची -- -

No comments:

Post a Comment