क्षण वैरागी मनही जोगी तरी स्वप्नांचा मोह सुटेना
क्षितीजामागे मावळतांना तेजाची आरास विझेना
भास कुणाचे असे छेडती, जपलेली अधुरिशी नाती
गाव मनाचे राहून गेले, मागे सरल्या वाटेवरती
चुकले थकले प्रवास सारे, तरी पावले कुणा शोधती
हरलो आता स्वत:शी मी, अस्तित्वाचा लेश उरेना
बंद पापणी पुन्हा शोधते, क्षण काही माझे-माझेसे
स्वप्नांच्या उरल्या राखेतून, गीत तुझे अधुरे उरलेसे
दाटून आले, आठव ओले, आतून काही गहिवरलेसे
कितीच गाणी आयुष्याची, गातो मी परि सूर मिळेना
No comments:
Post a Comment