NiKi

NiKi

Monday, April 2, 2012

जेव्हा तुझा मी विचार करतो


जेव्हा तुझा मी विचार करतो,
तेव्हा मी माणसात नसतो,
लोकाना मी वेडा वाटतो,
माझा त्यान्च्यावर राग नसतो.

हिवाळ्यात थन्डी पडते छान,
झाडाचे गळून पडते पान,
जेव्हा त्या पाने नसलेल्या झाडाकडे पाहतो,
तेव्हा हि मला तुझा विचार असतो.

उन्हाळ्यात जेव्हा सुर्य तापतो,
सुर्याच्या उन्हाने आम्बा पीकातो,
उन्हाच्या गर्मीने आम्ब्याच्या झाडाखाली बसतो,
तेव्हा हि मला तुझा विचार असतो.

पावासाळ्यात जेव्हा धो धो पाऊसा पडतो,
इकडे-तिकडे सैरावैरा माणूस पळतो,
पावसाच्या पाण्याने ओळा चिब भिजतो,
तेव्हा हि मला तुझा विचार असतो.

No comments:

Post a Comment