NiKi

NiKi

Monday, April 9, 2012



दूर डोंगराआडून,
सूर्योदय होणं.
कोमल किरणांनी,
धरतीला प्रेमळ गोंजारण.
मी होऊनी अंधार फक्त तुझी वाट पाहण

पाखरांची किलबिल,
मंजुळ गीत गाणं.
मंद शीतल हवा,
तुझा स्पर्श जाणवण.
मी होऊनी क्षण तुझी वाट पाहण.

भर दुपारीत,
सूर्यान मध्यान्ही येण.
भर धेरेदार झाडाखाली,
सावलीच एकत्र जमण.
मी होऊनी सावली तुझी वाट पाहण

सायंकाळ होताच,
पाखरांच परत येण.
माझ्या मनस्वरावर,
झाडाचं सुरेख डोलावण.
मी होऊनी घरट तुझी वाट पाहण

रात्र होताच, आकाशात,
चंद्र -चांदण्याचं जमण.
निजलेल्या धरतीला ,
चंद्रान मनसोक्त पाहण.
मी होऊनी प्रशांत, तुझी वाट पाहण.

No comments:

Post a Comment