ती जर मनात साठवत असेल
तर तु मुळीच काळजी करु नकोस
भावनांची अशीच साठवण होईल
नी एक दिवस मनात आभाळ दाटुन येईल
मग तुझ्या आठवणीच्या हळुचश्या झुळुकेनेही
मन तिचे नुसते सैर-भैर होऊन उठेल
नजर बेभानपणे तुझाच शोध घेईल
नी तुझ्या घट्ट मिठीत विसावुन
पाऊस तिच्या नजरेतुन बरसेल
No comments:
Post a Comment