हिरवाई कंच दाटलेल्या पावसात
बहरून येते तू...
तुझ्यात बहरतो मी...
परमात्म्याचे मुक्त जीवनाचे दान
तुझ्या माझ्या हाताच्या ओंजळीत...
टवटवीत दवात हसते पालवी
उमलून गर्भ
जेंव्हा नवा जन्म घेतो....
अंग अंगास त्याच्या
माय मातीचा गंध येतो....
सोनेरी चंदेरी पखरण करणारा
आकाशीचा बाप
इंद्रधनुष्याचे स्मित देतो...
त्याचा अंश,अनंत थेम्बातून
रोमां रोमांत प्रवाहित होत जातो
No comments:
Post a Comment