आठवण .. एक सहवास!!'
आठवणीसारखी दुर्लभ गोष्ट नाही ..
जितकी ती हवीहवीशी ,तितकीच नकोसं करून सोडते ..
तेवढीच हळवं करते जितकं सोबत राहून दिलासा देते..
जेवढी हट्टी तेवढंच सांभाळूनही घेते ..
आणि त्यात ती तुझी असली तर बोलणंच नको ..! :)
गालातल्या गालात हसवेल अन किंचित गुलाबी लाजवतेही .. :)
माझाच असावास असंच सांगते जणू ..
खरंच ..
''सहवासाने जपता येतात आठवणी की ...
प्रत्येक आठवण एक सहवास .....??
खरीखुरी वाटते जणू ...तर कधी निव्वळ आभास .....!!!!'' :)
No comments:
Post a Comment