तुझी माझी प्रित
राधा कृष्णाची रास व्हावी
वेणू च्या नादी तुझ्या
माझ्या पैंजणांची छूमछूम झंकारावी.
तुझी माझी प्रित
राम सितेचा आदर्श व्हावी
वनवासातील पर्णकूटीलाही
तृप्ततेची झालर झळकावी.
तुझी माझी प्रित
गौरी-शंकरासम पुण्य व्हावी
हिमालयाच्या शिखरावरही
तुझी माझी प्रित नांदावी.
तुझी माझी प्रित
विठोबा-रखूमाई भोळी
वसून स्वतंत्र मंदीरी
जय जय विठोबा-रखुमाई गर्जावी.
No comments:
Post a Comment