NiKi

NiKi

Friday, July 27, 2012



इतकी नाजुक इतकी अल्लड, फुलपाखाराहून हळवार,
चालू बघता नकळत होते वार्या वरती अलगद स्वार,...........

भिजल्या देही गवाक्षतुनी चन्द्र किरण ते पड़ता चार,
लक्ख गोरटी रापून जाली रात्रीत एका सावळनार,...............

इतकी नाजुक........जरा निफेनी जोर देऊनी लिहिता नाव,
गालीत आली दुसर्या दिवशी अंगा अंगावर हळवे घाव,.........

इतकी नाजुक, इतकी सुन्दर, दर्पण देखिल खुलावातो,
ती गेल्यावरती, तो क्षण भर प्रतिबिम्बाला धरु बघतो,........

इतकी नाजुक की, जेव्हा ती पावसात जाऊ बघते,
भीती वाटते कारण जलात साखर क्षणात विरघळते,………

इतकी नाजुक की, आता तर स्मरणाचे भय वाटे,
नको रुताया फुलास असल्या माझ्या जीवनातील काटे …....इतकी नाजुक …….||

No comments:

Post a Comment