तरीही ते ''अव्यक्त ''च ..!!
म्हणलं तर बरंच सांगेन असं म्हणते तुला ..
नाहीतर आहेच की पुन्हा माझ्यातली मी ..
नाही-हो म्हणता म्हणता सगळं काही बोलून टाकलं ..
तितकंसं नितळ नव्हत म्हणा ..
पण समाधान एवढंच की ते अव्यक्त नाहीये ...
गोष्टीत सांगतात त्याप्रमाणे राजा- राणी वगैरे , पण कधी कोणत्या राजकुमाराने - राजकुमारीला प्रोपोस करण्याच ऐकिवात नाही .. :)
माहिती नाही राहू कसे शकतात ...
यार .. काही झालं तरीही हे पाहिजेच ... :)
किंचित चेहऱ्यावर लाजरं हसू, उगाचंच खेचणं हवंच .. :)
या सगळ्या गोष्टी धम्माल आणतात ,आणि ..
का कोण जाणे आयुष्य अगदी हायसं वाटतं ...
नाहीतर आहेच की पुन्हा ... ''तुझा तू अन माझी मी'' ... !!! :)
पण ...
स्वतःला सावरायला शिकलं पाहिजे ..
भले कितीही अवघड ,कितीही अशक्य ...या भावनांना वेळीच थांबवलं पाहिजे ..
नको होऊन जातं कधीकधी ..
चिडचिड होते .. मान्य ..!!
पण कोणाला पर्वा आहे त्याची ??
..त्रास तुलाच ,काळजी तुलाच .. उबग येतो पुष्कळदा ..
पण .... नक्कीच ,मनाच्या कोणत्यातरी कप्प्यात ती स्वच्छंदी तू हसण्याचा,आनंदी राहण्याचा प्रयत्न करू पाहतीये .. तिला जाऊ नको देऊस ...
लोक काय विचार करतात ..हे सगळं गौण ..
..काय फरक पडतो तुझ्या उदास असण्याचा त्यांच्यावर ..
पण ''त्या'' मनाच्या निरागस कप्प्याला पडतो ..
जग ... स्वच्छंदी .... अगदी ....
हवहवस वाटेल मग आयुष्य
No comments:
Post a Comment