NiKi

NiKi

Thursday, July 26, 2012



काय मस्स्त पाऊस पडतोय .....!!!
पाऊस सारखा बडबडतोय.........!!
नाव तुझे घेताना,,,,,
नेमका अडखळतोय......!!
... काय मस्स्त पाउस पडतोय .......!!!

कधी दंवाचे......कधी थेंबांचे .......
कधी झाडावरती गारठून...
थरथरनाऱ्या पानांचे ....!
पाऊस गाणे गातोय..........
काय मस्स्त पाऊस पडतोय .......!!

नकळत घेतोय.....ताबा...मना वरती ...
अन रिप रिप करतोय ....
अलगद कानांवरती....!!
बाहेर कोसळत असला तरी........
माझ्या मनात धडधडतोय....
काय मस्स्त पाऊस पडतोय ......!!!

सांगतोय कधीचे.......नवे जुने बहाणे.....
कधी जुन्या आठवणी...कधी उद्याचे गाणे.....
बेसूर या जगण्याला....
सुरात गुंफतोय.........!
ओल्या चिंब वाटावरती......
नुसता सळसळतोय......!!
काय मस्स्त पाऊस पडतोय....!!

आता येशील तू.........प्रत्येक क्षणी वाटत.....
माझ्याही नकळत.....आभाळ मनात दाटत.....
मी उभा आहे तुझ्यासाठी
भिजत पावसात...........
ये परत लवकर....
होण्या आधी रात.....!!
हं...नेमका साला पाऊस...
मधेच कोलमडतोय ......!
काय मस्स्त पाऊस पडतोय.......!!!

काय मस्स्त पाऊस पडतोय.........
पाऊस सारखा बडबडतोय.........!!
नाव तुझे घेताना ,,,,,,,,,,,
नेमका अडखळतोय......
काय मस्स्त पाऊस पडतोय.........!!!

No comments:

Post a Comment