मलाही तुला मिठीत घ्यायचे होते
तुझा बाहुत डोके टेकवून झोपायचे होते
पण मला कधी जमलेच नाही
ओठ तुझे ओठात घेवून अमृत मलाही पियायचे होते
तुझा प्रेमाच्या सागरात खोलवर जायायचे होते
पण मला कधी जमलेच नाही
तुझा त्या दु:खात मलाही विरघळायचे होते
गालावरून ओघळणा-या अश्रूंना ओठांनी टिपायचे होते
पण मला कधी जमलेच नाही
पावसात तुझासोबत मलाही भिजायचे होते
हात तुझा हातात घेवून दूरवर चालायचे होते
पण मला कधी जमलेच नाही
No comments:
Post a Comment