NiKi

NiKi

Wednesday, July 25, 2012

दूर कुठेतरी समुद्रकिनारी
हातात हात घालुन बसायचय मला,
आकाशातील तारकांकडे बघताना
भविष्याचे हितगुज करायचय मला,
आयुष्यात प्रेम करायचय मला ...
माझ्या मांडीत डोक ठेऊन
तिला झोपी गेलेल पहायचय मला,
तिच्या शांत चेहेऱ्याकडे पहाताना
स्वतःशी स्मित करायचय मला
आयुष्यात प्रेम करायचय मला ...
... तिच्यासोबत थोड दुष्टपणे वागुन
तिला रागाने लालबुंद करायचय मला
तिची आसवें पुसता पुसता पटकन मिठीत घ्यायचय तिला
आयुष्यात प्रेम करायचय मला ...
आयुष्यातील तिचा हिमालय
तिच्या बरोबरीने चढायचाय मला
शिखरावर पोहोचताना माझ्या सोबतीच आनंद
तिच्या डोळ्यातुन व्यक्त झालेला अनुभवायचाय मला
आयुष्यात प्रेम करायचय मला ...
ति माझ्यापासुन दुर जात असताना
विरहाच्या कल्पनेने खिन्न व्हायचय मला
ति नसल्यामुळे होणाऱ्या वेदनांना
डोळ्यावाटे मुक्त करायचय मला
आयुष्यात प्रेम करायचय मला.......................

No comments:

Post a Comment