तू .. श्वासात दरवळणारा मुद्गंध ..
तू हळूवार प्रेमाचा रंग ..
तू ... दाटून आलेला मेघ ...
तू .. ओल्या पाटीवरची हलकी रेघ।..
तू चिवचिवाट पिल्लांचा ..
तू ..साक्षीदार हळव्या क्षणांचा ..
तू निरागस जसा .. बाळाचे पहिले बोबडे बोल।
तू .. नव्या पालवीवरली सुंदर ओल ..
तू रिमझिमणारा पाऊस जणू ..
तू ..गरजणारी वीज .पण हळू।..
तू निर्मल वाहता झरा ..
तू .. निस्तब्ध किनारा ..
तू होतास शांतशी ज्योत या अस्वथ मनात ..
तूच होतास एकला सोबती या अथांग सागरात ..!!!!
No comments:
Post a Comment