परवा अचानक एक कविता सुचली. आता कविता अचानकच सुचतात हे ही खरंच! पण ही कविता मात्र वेगळी आहे. मला मुलीच्या दृष्टीकोनातून सुचलेली…
तू हवा होतास…
मन बरसताना माझे तू हवा होतास.
ओल्या ओठांवरल्या दवाला तू हवा होतास.
ढगांचा गडगडाट, मनाचा हिंदोळा,
अंगावरचा शहारा, तुझ्यासाठी थांबला होता.
उबदार कवेत घ्यायला तू हवा होतास.
पावसाळ्यातला एकटेपणा, निसरडी माती,
उडणारा पदर तुझ्यासाठी थांबला होता.
वाहणारे ओहोळ सावरायला तू हवा होतास.
हिरवाई सगळीकडे, झाडं वाढलेली चिकार,
काट्यात झुलणारा गुलाब तुझ्यासाठी थांबला होता.
त्याच्या सुवासाला तू हवा होतास
No comments:
Post a Comment