NiKi

NiKi

Tuesday, July 31, 2012

आज अचानक पाऊस आला
अंतरी उमलला पावसाळा

भिजवु नये म्हणून घेतला
आडोसा जवळ वाहनाचा

कळले जेव्हा कांदे त्यात
आठवले मला डोळे तुझे

कातर आठवणीने भारलेले
... ढाळीत अश्रू संतत पावसाळा

भिजलो जरीही होतो बाहेर
अन अंतरी चिंब पावसाळा

अंगावरी थेंब थोडे थोडे
आठवांचा ओथंबला पावसाळा

ढगांचे डोळ्यातले काजळ
अन देशांतरीचा पावसाळा

पाऊस किती चालला आज
अगदी पावलांवर तिच्या

ती तशीही येत असते आठवात
आज आला तिच्यासारखा पावसाळा

पाऊस आता थांबला होता
हिवाळा उधळत वारा आला

उब आठवणीची तग धरून
एक आठव सांद्र उमलून गेला पावसाळा

बाहेर पाऊस थांबला जरी
अंतरी मात्र तसाच आहे पावसाळा

No comments:

Post a Comment