NiKi

NiKi

Friday, July 27, 2012

होता एक वेडा मुलगा,
तिच्यावर खुप प्रेम करायंचा,
आठवण तिची आल्यावर,
कविता करत बसायचा . . . .

कधी तिच्या केसात गुंतायचा,
कधी तिच्या डोळ्यात बुडायचा,

कधी तिच्या ओठांवर अडकायचा,
तर कधी गालावरगोड हसु आणायचा....

नेहमी काहीना काही उपमा द्यायचा,
आज परी तर उद्या सरी . . . .
प्रेम फक्त तोच करतो असे काही वागायचा....

पेनाची शाई संपली तरी शब्द संपेना,
त्याच्या कविता तिला हट्टाने दाखवायचा,

कवितेतील तीच तू अशी जाणीव मात्र द्यायचा....
कविता तिला आवडली की वही मागे चेहरा लपवून,
खुप गोड हसायची....


एक आठवण म्हणुन,

एक समाधान म्हणुन,

होता एक वेडा मुलगा,
तिच्यावर खुप प्रेम करायंचा.

No comments:

Post a Comment