आठवणींची न माझी
गट्टी फार आहे ..
दूर माणसे गेली
तरी त्यांना धार आहे ..
काही क्षण साथीतले
तर... काही विरहातले..
तुझ्यासंगे अनुभवल्या
दु:खाच्या सुखातले..!!
रंग उडून गेले ..
गंध विरून गेले..
मन हे ओथंबले
आज चिंब चिंब नाहले
आठवणीत रे डोळे भरून आले ....
तुझ्या आठवणीत रे डोळे भरून आले ....
No comments:
Post a Comment