NiKi

NiKi

Thursday, July 26, 2012

कसं रे सांगु तुला
मी तुझाच विचार करते,
धुंद तुझ्या मिठीत
मी स्वत:लाच हरवते.

... बोलणे तुझे ते मधाळ
... मी माझा राग ही विसरते,
बाहुपाशात मग तुझ्याच
अश्रुनां मोकळी वाट मिळते.

सांत्वन करता करता तू
मला स्वंत:मध्ये गुंतवतोस,
नकळत मग माझ्या
देहाशी खेळत बसतोस.

जादू तुझ्या स्पर्शातील
अशी माझ्यावर चालवतोस,
करुन मनाला बेधुंद
अवधे विश्वच माझे व्यापतोस.

नसतो तुझ्याशिवाय मला
दुसरा कसलाच ध्यास,
सांग ना रे तुच, का होतात?
स्वप्नांत मला हे असले भास...!!!!!

No comments:

Post a Comment