NiKi

NiKi

Wednesday, July 25, 2012

मला फक्त तूच आवडतेस

मला फक्त तूच आवडतेस, माझ्या मनात फक्त तूच बागडतेस...

तुझ्यशिवाय दुसऱ्या कोणाचा विचार मी करत नाही, या हृदयाची घंटा फक्त तूच वाजवतेस...

... जेंव्हा प्रथम तुला पहिले तेंव्हाच मी तुझ्या प्रेमात पडलो, आता तर तू माझेच जीवन होऊ पाहतेस...

तुझ्या निरागस चेहऱ्याकडे पाहून दुख मी सगळे विसरतो, आठवण यावी कधी त्यांची मात्र तूच मला सावरतेस...

कधीकधी भीती वाटते दुरावशील मजपासून, हे वाटून तूच मला धीर देतेस...

तुझ्या स्पर्शाची आस मला लागून राहते रोज रोज, तू मात्र भेटण्यासाठी गुपचूप निघून कधी मधीच येतेस...

काय म्हणावे माझ्या या वेड्या प्रेमाला, तू मात्र हसून मलाच वेड्यात काढतेस...

पण काय करू तुझी धुंदच अशी की व्यसने बरी म्हणायची पाळी तू आणतेस...

आता कित्येक दिवस झाले प्रेमाचे दोर बांधून, पण रोज एक धागा नव्याने तू विनतेस...

प्रेमात अखंड बुडाल्याचे निस्सीम तू मान्य करायला लावतेस, तुझ्याचसाठी मी जगतोय हे मला तू सारखे सारखे म्हणायला सांगतेस...

No comments:

Post a Comment