NiKi

NiKi

Wednesday, July 25, 2012


एकामेकांना भॆट्ण्य़ाची दोघानाही आस आहे
आपल्या मैत्रीमध्ये हीच एक गोष्ट फ़क्त
खास आहे
इन्द्र्धनुष्याच े रंग आहेत
आणि पारिजातकाचा वास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे
... मी म्हणजे जीवन आणि तु म्हणजे श्वास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे
संकटांची नाही भिती,
तुझ्या मैत्रीचा विश्वास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे
कधी वाटते फक्त तुझी मैत्री सच्ची,
बाकी दुनिया नुसता आभास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे
हवे काय अजुनि त्याला, मित्र तुझ्यासम
ज्यास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे
ओढ तुझ्या सावलीची माझिया रस्त्यास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे
असो वा नसो कुणी आपल्या संगे,
पर्वा त्याची कुणास आहे
आपल्या मैत्रीमध्ये मित्रा बरेच काही खास
आहे
माझ्या चुकांवरही मित्रा पांघरूण तुझे
हमखास आहे
आपल्या मैत्रीमध्ये मित्रा बरेच काही खास
आहे
तुझ्याबरोबर ऐन
उन्हाळा ही मजला मधुमास आहे
आपल्या मैत्रीमध्ये मित्रा बरेच काही खास
आहे

No comments:

Post a Comment