आज आत ही केवढी तगमग
किती दाटून आलेत ढग
तरी एकही थेंब न पडणे
मुकेच आज का आतले गाणे
तुझे असणे, तुझे नसणे,
ह्यावरच का सारे जगणे ?
कधी कोसलेले पाउस ?
एकदा तरी मनापासून
कधी जाणवेल ओल
कुठेतरी आतपासून ?
कधी अन्कुरणार बीज
एकदातरी रुजण्यासाठी ?
कधी उमलणार कुणी
एकदातरी फुलण्यासाठी ?
No comments:
Post a Comment