तुझ्या आयुष्यातल्या एका संध्याकाळी
मला माझं आयुष्य जगायचंय.....
समुद्रकिनारी तुझ्यासोबत वाळूत बसायचंय...
उसळणार्या लाटा
पायावर घेउन तुला लाजताना पहायचंय...
... तुझ्या आयुष्यातल्या एका संध्याकाळी
मला माझं आयुष्य जगायचंय.....
चैपाटीवर तुझ्यासोबत स्वछंद्पने फिरायचंय...
निवांत बसून एकमेकांच मन
समजुन घ्यायचंय...
तुझ्या आयुष्यातल्या एका संध्याकाळी
मला माझं आयुष्य जगायचंय.....
घरी परतताना चटपटीत
पानीपूरी खायचीय....
पानीपूरी खातानाही तुला माझ्याशी बोलताना पहायचंय...
तुझ्या आयुष्यातल्या एका संध्याकाळी
मला माझं आयुष्य जगायचंय.....
बाळपणीच्या गमती जमती तुला हसत-हसत
सांगायचंय...
आणि हे सर्व ऐकताना
तुझ्या चेहर्यावरचं गोड़ हसू
पहायचंय..
No comments:
Post a Comment