NiKi

NiKi

Friday, July 27, 2012



"मी रोज अनुभवतो तिला....

प्रत्येक लयबद्ध गाण्यामधे,
आणि,
जाणवतो मला तिचा निखळपणा ओल्याचिंब पावसाच्या पाण्यामधे.

मी रोज अनुभवतो तिला....

गुलाबाच्या पाकळीच्या स्पर्शामधे,
कित्येकदा पाहिलय तिला अंधारात उभ त्या निष्ठुर निशब्द आरश्यामधे.

मी रोज अनुभवतो तिला....

मोगऱ्याच्या गर्द सुवासामधे,

मखमली मिठीत सापडतो तिच्या प्रत्येक बेधुंद श्वासामधे.

मी रोज अनुभवतो तिला....

शब्दासारख माझ्या आठवणीच्या प्रत्येक पानावर.
हे असच
तिला बोलावून घेतो जेव्हा दडपण येत वेड्याच्या मनावर...."

No comments:

Post a Comment