NiKi

NiKi

Monday, July 23, 2012

विचारांत विचार अन नंतर हलकंसं हसू ... कि खरंच कशाला गुरफटून घ्यायचं स्वतःला ..
उलगडूदे रहस्य अपोआप आयुष्याचं ..
आपण का त्या घडयाळाच्या काट्याप्रमाणे त्याच्या भोवती फिरायचं ..
वेळेत होतंय न सगळं ..
स्वतःला का मापून ठेवायचं ..!


हसायचं खळखळून .. रडावंही मोकळेपणे .. सांगायचं असतं काही मनातलं .. अलबत .. ''बरंच काही'' ..!!!
पण तरीही स्वतःला का बंदिस्त करायचं ..
खुलेपणाने श्वास घेत मस्त आयुष्याच्या बोटीत स्वतःला झोकून द्यायचं ..


फंडू आहे ना आयुष्य ..
ते फक्त मनमुराद जगायचं ..!! :) :) :)

No comments:

Post a Comment