कातरवेळी आठवणी मनात गर्दी करतात
डोळ्यांवाटे भावनांना वाट करून देतात
म्हणून आठवणींच्या जगात जायला मन माझे घाबरते
तुझी आठवण काढून पुन्हा पुन्हा रडते
आता आठवणीही माझ्याकडे अपरिचित प्रमाणे बघतात
कोणासाठी आसवे गाळली नेहमी विचारतात
आठवणींच्या स्वार्थी प्रश्नाने मन माझे दुखावते
मनातील आठवणींच्या काप्पांमुळे वेडे मन हळहळते
आठवणी माझ्या वेड्या मनाकडे बघून हसत होत्या
कारण त्याच आठवणी माझ्या एकटेपणात मला साथ देत होत्या...
No comments:
Post a Comment