आवडावं कोणी..
जपावं कोणी..
हसून लाजावं अन लाजून हसावं कोणी ..
हुमसून रडताना हलकेच हात धरावा कोणी ..
बोला धरताच हक्कानं रागवावं कोणी..
आवडीने ऐकत .. सोबतीत बेधुंद व्हावं कोणी ..
मनाच्या लहरींची साद न बोलताच ऐकावी कोणी ..
रुसता उगाच प्रेमानं पहावं कोणी..
तू माझी म्हणण्यापेक्षा ''मी तुझा'' म्हणावं कोणी .. :)
अविरत प्रेम काय असतं हे सांगण्यापेक्षा अनुभवावं कोणी
No comments:
Post a Comment