ए सावळ्या मुली गं
सांगू कसे तुला मी
माझाच मी न उरलो
झालो पुरा तुझा मी
स्वप्नात मी तुझ्याशी
गोष्टी कितीक करतो
येता तुझ्या समोरी
पुन्हा मुकाच ठरतो
ही ओढ जीवघेणी
झुरतो तुझ्या विना मी
जादू तुझ्या छटांची
घायाळ रोज करते
मी टाळतो तरीही
मन आठवांत फिरते
आता तुझ्याच साठी
वेडापिसा खुळा मी
स्वप्नात पाहिलेले
सत्यातही घडावे
जगणे तुझे नि माझे
बघ एकरूप व्हावे
जगणे तुझ्या विना गं
जगणे न मानतो मी
No comments:
Post a Comment