ओळखीचं रुपांतर मैत्रीत होतं
ते म्हणजे प्रेम नव्हे
असतो तो फक्त एक सहवास
मैत्रीनंतर जवळीक होते
ते म्हणजे प्रेम नव्हे
असतो तो फक्त एक सहवास
मनं जवळ येतात
ते म्हणजे प्रेम नव्हे
असतो तो फक्त एक सहवास
एकमेकांशिवाय करमत नाही
ते म्हणजे प्रेम नव्हे
असतो तो फक्त एक सहवास
घडणारी प्रत्येक गोष्ट सांगितली जाते
ते म्हणजे प्रेम नव्हे
असतो तो फक्त एक सहवास
न सांगताच भावना कळू लागतात
तेंव्हाच तर खरं प्रेम होतं
नसतो तो फक्त एक सहवास
No comments:
Post a Comment