तू असतेस तेव्हा काळोख ही प्रकाशमान होतो...
तू नसतेस जेव्हा भर दुपारीही अंधारून येतं
तू असतेस तेव्हा अश्रूंचेही मोती होतात
तू नसतेस जेव्हा मोतीही अश्रूंच्या सरीभासतात....
... तू असतेस तेव्हा दु:खालाही हसू येते...
... तू नसतेस जेव्हा सुखही माझ्यासवे रडू लागते...
तू असतेस तेव्हा निवडून्गालाही बहर येतो...
तू नसतेस जेव्हा मोगराही फुलायला नकार देतो...
तू असतेस तेव्हा दु:खातही मी उभा राहतो....
तू नसतेस जेव्हा सुखातही मी उन्मळून पडतो...
तू असतेस तेव्हा मृत्यूलाही अर्थ असतो...
तू नसतेस जेव्हा जगण्यालाही अर्थ नसतो
No comments:
Post a Comment