ऐक जरा
तू आलीस आणि मात्र
पुलकित झाली गात्र
ही साद घालते रात्र
ऐक जरा
चांदण भिजली माती
सुगंध झरला वाती
स्पंदने त्वरली छाती
ऐक जरा
रुधिर धावता लाव्हा
संगम शोधित जावा
अधर छेडला पावा
ऐक जरा
सरले असे हे तास
कसे अद्वैताचे भास
ताल हरवला श्वास
ऐक जरा
आताशा थांबले सारे
आकाशी विझले तारे
शांतता प्यायले वारे
ऐक जरा
पेंगूळ निजली राने
दवांत भिजली पाने
ही पहाट गाई गाणे
ऐक जरा
मी कुठे बोललो काही,
नी तुही ऐकले नाही,
जे गूज मौनात प्रवाही
ऐक जरा
No comments:
Post a Comment