मी कोठेही असो
तू सोबत असतेस
मी कोठेही बसो
तू बाजूला बसतेस
मी पापण्या मिटतो
तरी तू दिसतेस
माझ्याकडे बघून
खुदकन हसतेस
मी तुला हाकलतो
तरी मला छळतेस
...
तू सोबत असतेस
मी कोठेही बसो
तू बाजूला बसतेस
मी पापण्या मिटतो
तरी तू दिसतेस
माझ्याकडे बघून
खुदकन हसतेस
मी तुला हाकलतो
तरी मला छळतेस
...
पाया पडतो तरी
तू सोबत रहातेस
प्रेम केलंय म्हणून
तू वेड लावतेस
तुझे सारे हट्ट
पूर्ण करून घेतेस
हात थकून जातात
तरी लिहायला लावतेस
कळत नाही इतके शब्द
तू कोठून आणतेस
इतक्या साऱ्या लोकांसमोर
नको वेड लावूस
सांगतो तरी ऐकत नाही
असं नको करूस
तुझ्या अशा करणीन
कसं प्रेम लपवू
कुणी म्हटल वेडा तर
त्याला कसं अडवू
तू ठरवलं आहेस तर
मी तरी काय करू
गुलाम झालोय तुझा
मी काय बोलू .
तू सोबत रहातेस
प्रेम केलंय म्हणून
तू वेड लावतेस
तुझे सारे हट्ट
पूर्ण करून घेतेस
हात थकून जातात
तरी लिहायला लावतेस
कळत नाही इतके शब्द
तू कोठून आणतेस
इतक्या साऱ्या लोकांसमोर
नको वेड लावूस
सांगतो तरी ऐकत नाही
असं नको करूस
तुझ्या अशा करणीन
कसं प्रेम लपवू
कुणी म्हटल वेडा तर
त्याला कसं अडवू
तू ठरवलं आहेस तर
मी तरी काय करू
गुलाम झालोय तुझा
मी काय बोलू .
No comments:
Post a Comment