NiKi

NiKi

Friday, August 24, 2012



काल राती न्हाऊन शयनगृही
अशी तू आली ,
केस मोकळे घेऊन पाठीवर
टप टपत पाणी !


चेहरा नितळ अन त्यावर
जल-बिंदूचे मोती ,
भासली जणू माझ्या घरी,
जलपरीच तू आली !

 लांब सडक केस झाड्ले तुझे
पाहत मज दर्पणी ,
वेधले लक्ष माझे तुषार जसे,
चार पडले चेहर्यावरी !

 चीडवलेस जव मजला तू
वेडावून दाखवत हांसुनी ,
कडाडून गर्जले मेघ नभी

घाबरावीत तुज अंतर्मनी !
 बंद करू जाता गवाक्ष
मी झडकरी ,
नजर आपसूक खिळली तव

कमनीय बांध्यावरी !
 ओष्ठ दाबत हंसून मज
प्रत्साहित तू लाजली ,
आकाशी तत्क्षणी हाय कशी

वीज भयानक कडाडली !
दचकून आवाजाने घाबरून मज
अशी तू बिलगली ,
मदन वीज जणू निमिषार्धात
अंगी मम संचारली !


प्रेम-भारीत मेघांची जशी
मधुर भेट झाली ,
अमृतधारांची बरसात करून तृप्त धरा
कुशीत शांत निजली

No comments:

Post a Comment