
पौर्णिमेची रात्र ...!
उगवला आज पुन्हा
चंद्र पुनवेचा आभाळी ,
हाय फिरून आठविली
स्वप्ने प्रेमभरी सुहानी !
अंतरी जपलेल्या जखमेची
खपली पुन्हा निघाली ,
फिरूनी प्रीत दिवाणी
जुन्या जखमेतून भळभळली !
मृदुवार स्पर्षं तुझे
मोहरती आजही मना ,
मदभरे श्वास तुझे
उन्माद्ती आजही तना !
शीत मंद पवन
शहारत होता तुला ,
मिठीत शिरून प्रेमाने
बिलगले होतेस मला !
तू नसताना तोच
वात बोचतो तनमना ,
एकटा हताश तुजवीण
कशा साहू मनोवेदना !
किती पौर्णिमेच्या राती
मरणप्राय मी सहायची,
वाटते संपवावी अता
जिंदगी बनावटी चेहर्याची
No comments:
Post a Comment