NiKi

NiKi

Wednesday, August 29, 2012

प्रीत नकळत कशी रे जडली तुझ्यावर ...!!


कोडे प्रेमाचे ना सुटले मज आजवर ..
प्रीत नकळत कशी रे जडली तुझ्यावर ...!!


हवा हवासा वाटे जरी मनातून
जवळी येता का धडधडे उरातून,
किमया अशी केलीस तू माझ्यावर,
पाहताच मी मन जडले तुझ्यावर ...!!

कोडे प्रेमाचे ना सुटले मज आजवर ..
प्रीत नकळत कशी रे जडली तुझ्यावर ...!!



भेट पहिली तुझी नि माझी
चंद्र साक्षीने एकांती अशी घडली,
तव स्पर्शाचे मोरपीस फिरता तनुवर
नवख्या जाणीवेत राहिले ना भानावर ...!!

कोडे प्रेमाचे ना सुटले मज आजवर ..
प्रीत नकळत कशी रे जडली तुझ्यावर ...!!



हळूच अलगद मज घेता मिठीत
रोमांच अनामिक उठले तन मनात
धुंद तुझ्या सहवासात मोहरले क्षणभर
निशाणी ठेवली मी तव ओठांवर ...!!

कोडे प्रेमाचे ना सुटले मज आजवर ..
प्रीत नकळत कशी रे जडली तुझ्यावर ...!!





No comments:

Post a Comment