NiKi

NiKi

Tuesday, July 31, 2012

कुणीतरी हव असत ,जीवनात साथ देनार

हातात हात घेउन , शब्दान्शिवाय बोलनार्…

कुणीतरी हव असत ,जीवाला जीव देनार

... फ़ुलातल्या सुगन्धासारख,आयुष्यभर जपनार्…

कुणीतरी हव असत ,हक्कान् रागावनार,

चुका ज़ाल्या तरी,मायेन समज़ावनार…

कुणीतरी हव असत ,आपल म्हननार

नजरेतले भाव जानुन,आपल्याला ओळखणार…

कुणीतरी हव असत ,बरोबर चालणार,

कशीही वाट असली तरी,माग न फ़िरनार…

कुणीतरी हव असत ,वास्तवाच भान देणार,

कल्पनेच्या विश्वातही,माझ्यासवे रमणार…

कुणीतरी हव असत,मनापासुन धीर देणार,

स्वतहाच्या दुखातही,मला सामाउन घेणार…

कुणीतरी हव असत,एकान्तातही रेन्गाळनार,

माझ्यासोबत नसतानाही,मझ्यासोबतच असनार…

कुणीतरी हव असत,विश्वास ठेवणार,

माझ्या विश्वासाला.कधीही न फ़सवणार…

कुणीतरी हव असत,मला समजुन् घेनार,

आयुष्याच्या वाटेवर साथ देशील का विचारणार…...
"कुणीतरी आवडणं म्हणजे प्रेम की …
कोणाच्या डोळ्यात हरउन जाणं म्हणजे प्रेम …

कोणालातरी सारखं पाहत रहावसं वाटणं म्हणजे प्रेम की …
कोणालातरी विसरता न येणं म्हणजे प्रेम…
... कोणाची तरी प्रत्येक गोष्ट आवडणे म्हणजे प्रेम की …
आपली आणि कोणाच्या तरी आवडी जुळणे म्हणजे प्रेम …

कोणी स्वप्नांत येणं म्हणजे प्रेम की …
कोणाच्या सहवासात स्वप्न
... जगल्यासारखं वाटणं म्हणजे प्रेम …

कोणावर विश्वास ठेवणे म्हणजे प्रेम की ….
कोणाचातरी विश्वास कधीच न तोडणे म्हणजे प्रेम...

कुणाला माफ करणे म्हणजे प्रेम की ….
कुणाची तरी उगीचच माफी मागणे म्हणजे प्रेम ….

कुणाकडून काही घेणं म्हणजे प्रेम की ….
न मागता कोणाला काहीतरी देणं म्हणजे प्रेम ….

कोणासाठी तरी रडणारं मन म्हणजे प्रेम की….
कुणाच्या तरी आठवणींत हसणारं मन म्हणजे प्रेम ….

कोणाशिवाय मरणं म्हणजे प्रेम की …
कोणासाठी जगणं म्हणजे प्रेम …

कोणासोबत चालणं म्हणजे प्रेम की ….
आयुष्यभर कोणासाठी थांबणं म्हणजे प्रेम ….

कुणीतरी सुखात असल्याचा आनंद म्हणजे प्रेम की ….
कुणाच्या तरी सोबतीताला आनंद म्हणजेच प्रेम….!!"

खरच..!! प्रेम नेमकँ काय असतं...


कधी रुसवा होतो माझाच माझ्या देवाशी
मग रंगते भांडण माझेच माझ्याशी
स्वतःला मग स्वतःच समजवायचे
हृदयावर ओरखड्यांचे गोंदण सजवायचे

रंगही माझेच अन ढंगही माझेच
रुसणेही माझेच अन फसणेही माझेच
त्याला तर नसते घेणे कशाशीच ...
जगणेही माझेच अन मरणेही माझेच


सुचतच नाही, काही शब्द उधार दे
गातच नाही मी, गाण्याची एक बहार दे


नको टांगुस जिवाला, होकारही राहु दे
लटक्या रागात, एक रुसलेला नकार दे


टेकवुन माझ्या छातीवर डोके, तू विसावा घे
अन तुझ्या सुगंधी श्वासाने ह्रदयात एक झंकार दे
पाऊस पडून गेल्यावर, मन पागोळ्यांगत झाले
क्षितीजाच्या वाटेवरती पाण्यावर रांगत गेले
थेंबांना सावरलेल्या त्या गवतांच्या काडांचा
पाऊस पडून गेल्यावर, मी भिजलेल्या झाडांचा
पाऊस पडून गेल्यावर, मन थेंबांचे गारांचे
आईस चकवूनी आल्या त्या डबक्यांतील प...ोरांचे
मोडून मनाची दारे, येवुली पाऊल भरती
पाऊस पडून गेल्यावर, या ओल्या रस्त्यावरती
पाऊस पडून गेल्यावर, मी चंद्रचिंब भिजलेला
विझवून चांदण्या सार्‍या, विझलेला शांत निजलेला
पाऊस पडून गेल्यावर, मन भिरभिरता पारवा
पाऊस पडून गेल्यावर, मन गारठता गारवा
आज अचानक पाऊस आला
अंतरी उमलला पावसाळा

भिजवु नये म्हणून घेतला
आडोसा जवळ वाहनाचा

कळले जेव्हा कांदे त्यात
आठवले मला डोळे तुझे

कातर आठवणीने भारलेले
... ढाळीत अश्रू संतत पावसाळा

भिजलो जरीही होतो बाहेर
अन अंतरी चिंब पावसाळा

अंगावरी थेंब थोडे थोडे
आठवांचा ओथंबला पावसाळा

ढगांचे डोळ्यातले काजळ
अन देशांतरीचा पावसाळा

पाऊस किती चालला आज
अगदी पावलांवर तिच्या

ती तशीही येत असते आठवात
आज आला तिच्यासारखा पावसाळा

पाऊस आता थांबला होता
हिवाळा उधळत वारा आला

उब आठवणीची तग धरून
एक आठव सांद्र उमलून गेला पावसाळा

बाहेर पाऊस थांबला जरी
अंतरी मात्र तसाच आहे पावसाळा


पाऊस वनातला..
झिम्माड झाडीतला, गच्च हिरव्या पंखांनी उडणारा...

पाऊस दृष्टीतला...
पाऊस सृष्टीतला,
... पिरपिरणारा,किरकिरणारा, आठवणींच्या गर्दीतला..

पाऊस वसुधेचे प्रणयगान,
पाऊस सरितेचे प्रेरणास्थान...
उधाणणारा,बेभान सारा, अंगी रुणझुणणारा...

पाऊस नभाच्या खाणीतला..
पाऊस सप्तरंगी थेंबातला,
ऐटीत बरसणारा,जणु अधिकारी वर्दीतला...

पाऊस क्षणाचा गारवा..
पाऊस भरल्या डोळ्यांचा पारवा..
उध्वस्त नजरेचा,दडलेल्या हुंदक्याचा आसरा..

पाऊस उनाड पोर...
पाऊस रंगीबेरंगी मोर,
नाचरा, भिरभिरा, लहान थोर सा-यांच्या मर्जीतला...

पाऊस आसुसलेला,
पाऊस कासाविसलेला..
डोळ्यातुन टपटपणारा,कवितेत रेंगाळणारा....

पाऊस त्रेधातिरपीट...
पाऊस उन्हाची उघडीप,
अल्लड्,निरागस, लुकलुकु बघणा-या बाळाच्या सर्दीतला..

पाऊस तारेवरचा मोती,
पाऊस धन धान्याची पोती,
धुवाधार कोसळणारा,उन्हाचे उखाणे सोडवणारा...
ती म्हणजे खरंच पावसासारखी.
 ती म्हणजे खरंच पावसासारखी
थेंबा थेंबाने येते आणि आपल्याला व्यापून टाकते.
वरून दिसतो आपण कोरडेच
पण ती आपलं मनही ओलेचिंब करून जाते.
********************************************
आपण पहात रहातो खिडकीतून रिमझिमणारा पाऊस पाणी,
पण तो पाऊस नसतोच मुळी त्या असतात तिच्या आठवणी.
आपल्याही नकळत आपण खिडकीतून हात बाहेर काढतो
आणि तिला तळहातावर घेतो. पुन्हा पावसात हरवून जातो.
******************************************* तळहातावर ती, बाहेरही ती, आपणही स्वतःला झोकून देतो
आपल्याही नकळत खिडकीतून बाहेर जातो.
ती रिमझिमणारी सर, आपण मुसळधार पाऊस होतो.
तिच्यासह अवताल भवताल सारं सारं कवेत घेतो.


ह्या रिमझिम झिलमील पाऊस धारा
तन मन फुलवून जाती

सहवास तुझा मधुमास फुलांचा
गंध सुखाचा हाती
हा धुंद गार वारा
हा कोवळा शहारा
उजळून रंग आले
स्वच्छंद प्रीतीचे
चिंब भिजलेले रूप सजलेले
बरसुनी आले रंग प्रीतीचे

ओढ जागे राज सारे अंतरी सुख बोले
सप्तरंगी पाखरू हे इंद्रधनू बघ आले
लाट हि वादळी मोहुनी गाती
हि मिठी लाडकी होवारा होती
पडसाद भावनांचे रे बंध ना कुणाचे
दाही दिशात गाणे बेधुंद प्रीतीचे
चिंब भिजलेले रूप सजलेले
बरसुनी आले रंग प्रीतीचे

Monday, July 30, 2012


कधी कधी अस का होत ..मला कळतच नाही.....
खुप काही बोलायच असत..... पण बोलतच येत नाही ....
स्वतःला व्यक्त करायच असत... पण काय ते समजतच नाही.....
खुप खुप रडायच असत.... पण रडताच येत नाही.....
शब्दांच्या माळा गुंफायच्या असतात... पण शब्दच सापडत नाही....
... एकांतात बसुन रमायच असत.... पण गर्दी कमी होतच नाही ....
सर्व आठवणीं सोबत परत एकदा जगायच असत.... पण क्षणच पुरत नाहीत ...
अंधरा कडे वळावस वाटत.... पण सूर्य मावळतच नाही......
पावसात भिजून अश्रू लपवावेसे वाटतात .... पण पाऊसच पडत नाही...
 खरच कधी कधी अस का होत मला खरच कळत नाही.......

प्रेम......
जग जाहिर करन्यापेक्षा......
ज्यावर् प्रेम करतो ....
त्यालाच एकदा सांगून बघावे......
खुप छान वाटते....
... लोकांसोबत खोटे हसन्यापेक्षा......
एकांतात बसुन रडावे......
खुप छान वाटते.....
आवडत्या व्यक्तीच्या सहवासात...
काही क्षण घालवावे....
खुप छान वाटते.....
चांदन्या राती ओसाड रास्तया वर फिरावे....
खुप छान वाटते.....
पहिल्या पावसात....
बेधुन्द होउन भिजावे....
खुप छान वाटते.....
आयुष्यात एकदा तरी प्रेम करुन बघावे....
खुप छान वाटते....

उगवत्या सूर्याकङे पाहिले की तुझी आठवण येते....
आकाशातल्या चंद्राकडे पाहिले की तुझी आठवण येते.....
उगाच एकटे बसताना...
तुझ्या आठवणींची आठवण येते.....
तु दिलेल्या दुख़ाची जाणीव होते.....
... तु जवळ आहेस याची चाहूल लागते.....
क्षणभर सारे विसरुन तुझ्यात रामावेसे वाटते.....
तुझ्या सहवासात सगळे जग विसरावेसे वाटते......
पण...
क्षणात हे सगळे धूसर होते......
मावळत्या सुर्यासोबत तुहि जाशील हे ठाऊक नव्ह्ते....
मागे ठेऊन दुख विरहाचे......
दुख अबोल नात्याचे.......

तुझ्या आयुष्यातल्या एका संध्याकाळी
मला माझं आयुष्य जगायचंय.....
समुद्रकिनारी तुझ्यासोबत वाळूत बसायचंय...
उसळणार्या लाटा
पायावर घेउन तुला लाजताना पहायचंय...
... तुझ्या आयुष्यातल्या एका संध्याकाळी
मला माझं आयुष्य जगायचंय.....
चैपाटीवर तुझ्यासोबत स्वछंद्पने फिरायचंय...
निवांत बसून एकमेकांच मन
समजुन घ्यायचंय...
तुझ्या आयुष्यातल्या एका संध्याकाळी
मला माझं आयुष्य जगायचंय.....
घरी परतताना चटपटीत
पानीपूरी खायचीय....
पानीपूरी खातानाही तुला माझ्याशी बोलताना पहायचंय...
तुझ्या आयुष्यातल्या एका संध्याकाळी
मला माझं आयुष्य जगायचंय.....
बाळपणीच्या गमती जमती तुला हसत-हसत
सांगायचंय...
आणि हे सर्व ऐकताना
तुझ्या चेहर्यावरचं गोड़ हसू
पहायचंय..

गुलाब सांगतो,
येता जाता रडायचं नसतं,
काट्यात सुध्दा हसायचं असतं;
रात रानी म्हणते,
अंधाराला घाबरायचं नसतं,
... काळोखात ही फुलायचं असतं;
सदाफुली सांगते,
रुसुन रुसुन रहायचं नसतं,
हसुन हसुन हसायचं असतं;
बकुळी म्हणते,
सवळ्या रंगाने हिरमुसायचं नसतं,
गुनाच्या गंधाने जिंकायचं असतं;
मोगरा म्हणतो,
स्वत:चा बडेजावपणा सांगायचा नसतो,
सदगुनांचा सुगंध मैलवरुन ही येतो;
कमळ म्हणतो,
संकटात चिखलात बुडायचं नसतं,
संकटांना बुडवुन फुलायचं असतं....

हरवले...
मी हरवले....
ती पहिली नज़र ..
ती पहिली भेट ...
पाहुन तुझ्या डोळयात ...
... हरवले...
मी हरवले....
ती साधी ओळख..
ते तुझे बोलने...
माझ्या कड़े पाहुन...
हळुच तुझे हसणे...
हास्यात तुझ्या...
हरवले...
मी हरवले..
अनोळखी तुन मैत्री..
मैत्री तुन प्रेम ...
कधी पार झालो...
कळालेच नाही..
प्रेमात तुझ्या...
हरवले ..
मी हरवले....
शांत असलास तरी..
ऐकते तुझ्या मानतले..
सारे बोल....
शब्धात तुझ्या...
हरवले...
मे हरवले...
ऋतु बदलत गेले...
पण बदलले नही..
ते नाते ...
आजही हातात हात असतो..
मीठीत तुझ्या...
हरवले...
मी हरवले...

तुला पाहते मी, मना येतो धीर
तुला भेटण्या जीव, होतो अधिर

तरिही मनाला, भयाचे भुलावे
कसे मी तुला, आपले रे म्हणावे
... तुझी माझी तुलना, जसे नीर क्षीर
तरी वेडी आशा, नि वेडाच धीर

तुला पाहते मी, मना येतो धीर
तुला भेटण्या जीव, होतो अधिर

तुझे हासणे, चंद्र फुलतो जसा हा
तुझे चांदणे, जन्म वेडा पिसा हा
तुझे स्वप्न सत्यात, भीनले अचानक
जसे शब्द दोह्यात, विणतो कबीर

तुला पाहते मी, मना येतो धीर
तुला भेटण्या जीव, होतो अधिर
ही वाट एकटीची
दूर दूर जाती
सोबत मिळावी प्रेमाची
नको ती साथ एकांताची
 
काही दिवस आनंदाचे
काही दिवस दु:खाचे
कित्येक रात्री घालवले अश्रुत

नको ते प्रेम
पण हवी ती साथ
नको ते आयुष्य
पण हवी ती सोबत

जगू शकत नाही तुझ्याशिवाय
पण सोबत ही जगू शकत नाही
विचार करवेना दुसरयाचा
तरी हवी सोबत नव्याची
काय करू मज कलेना
आयुष्याचे कोडे उमजेना


आठवणींची न माझी
गट्टी फार आहे ..
दूर माणसे गेली
तरी त्यांना धार आहे ..

काही क्षण साथीतले
तर... काही विरहातले..
तुझ्यासंगे अनुभवल्या
दु:खाच्या सुखातले..!!
रंग उडून गेले ..
गंध विरून गेले..
मन हे ओथंबले
आज चिंब चिंब नाहले

आठवणीत रे डोळे भरून आले ....
तुझ्या आठवणीत रे डोळे भरून आले ....


आला पाऊस
तुझी आठवण घेऊन
बरसल्या आठवणी
... पाण्याच्या थेंबाथेंबातून

आज वाटे या वातावरणात
हवा होतास तू सोबत
विसरले असते दु:ख
भिजले असते एकांत विसरून

पावसाचे थेंब डोळ्यावरून ओघळले
क्षणात वाटे असे की अश्रु पुन्हा आडवे आले.


आयुष्य म्हणजे नात्याचा खेळ
आयुष्य म्हणजे नात्याची वेळ

... प्रेमात हवे दोन सोबती
खेळlतही हवे दोन सोबती

प्रेमात हवे सोबतीचा वेळ
वेळेत हवे प्रेमाची साथ

दूर राहूनही होते प्रेम
जवळ राहूनही होते प्रेम

दुराव्यात कधी विसर पडावा
नेम नाही याचा
सोबतीत कधी भांडणाचा भडका उडावा
नेम नाही याचा.


कातरवेळी आठवणी मनात गर्दी करतात
डोळ्यांवाटे भावनांना वाट करून देतात
म्हणून आठवणींच्या जगात जायला मन माझे घाबरते
तुझी आठवण काढून पुन्हा पुन्हा रडते
आता आठवणीही माझ्याकडे अपरिचित प्रमाणे बघतात
कोणासाठी आसवे गाळली नेहमी विचारतात
आठवणींच्या स्वार्थी प्रश्नाने मन माझे दुखावते
मनातील आठवणींच्या काप्पांमुळे वेडे मन हळहळते
आठवणी माझ्या वेड्या मनाकडे बघून हसत होत्या
कारण त्याच आठवणी माझ्या एकटेपणात मला साथ देत होत्या...


तुझ्या शब्दांनी हृदयात माझ्या
बांधले तोरण
त्यात आहे जणू रूप गं तुझे
स्पंदनांचे स्मरण

समोर प्रत्यक्षात
आणि त्या तिथे आकाशात
नक्षत्रांचे प्रतिबिंब
नक्की पडले आहे कशात?

ना भावनांना येईल माझ्या
कधीही मरण
त्यात आहे जणू रूप ग तुझे
चिरकाल जीवन

मनाने गुंफले विचार
तुझ्या माळेत
माझ्या मनाचे मनही तुच
सोनेरी मनात

नाव जीवनाला जीवन तुझे
तुझेच ते क्षण
तुझ्या शब्दांनी हृदयात माझ्या
बांधले तोरण


मस्त वारा
थंड हवा
संध्याकाळ ही
छान किती!

वा-यासोबत
हलणारी पाने
त्यांची सळसळ
मधू‍ऽर ही

विखुरलेले
रंगीत ढग
स्थिर त्या तिथे
आकाशी

त्यांच्याच नादात
त्यांच्या जीवनात
किलबिल पक्षी
न लहान प्राणी

निसर्ग हा
दाखवतो आहे
खरी प्रसन्नता
मनाची

ह्या मनात
खुलू दे
असाच आभास
जीवनात केंव्हाही

अशाच एखाद्या
संध्याकाळीही


समोर उडतं फुलपाखरू
हे निर्मळ प्रेम जणू
तू निरागस जीवनाची खरी साथ

नजर ही चोरताना तुला
समजत नाही?
कळणारच तुला...
तू लाजून समजावंस
इच्छा असावी

उमललेले फुल तनू
आणि जीवन स्मरण जणू
तू निमिष जीवनाची साठवण

नजरेच्या कोनामधून
कानोसा घे या हृदयामधून
तू अलगत सावरताना
मज सांगे ओढणी

जशी एक नाजूक तरू
निरागस, कोमल जणू
तू ‘अस्पर्श’ प्रेमाची हृदयातली वाट


नजरानजर होईल जशी
खाली तू बघताना अशी
मज ‘अबोल’ भाषेत
बोलतेस कशी!?

मनात येताना अशी
आणि मग जातेस कशी?
तू स्मृतीत उरलेली एक तहान

समोरून जाताना तुला
हृदयाने या स्पर्ष केला
या छोट्याशा जीवनाने
काही गुन्हा केला!?

मन अगदी तूच तू
तेही एक मृगजळ जणू
मज प्रेमास ग तू अफाट सागर


तुझ्या- माझ्या आठवणी
माझ्या कायम राहतील मनात
त्याच तर माझे जीवन
या जीवनात

प्रत्येक छायाचित्र आठवणींचे
काही देते आठवण करून
मग मी हळूच पुढचे बघतो
कसलासा विचार करून

हो कधीच नाही रहात
कुठलाही हातात हात
पण जीवनभर स्पर्श तो
हृदयाला देतो साथ

जेंव्हा आपण जवळ होतो
खरंच मला वाटलं होतं
तू माझी आताच.....
नंतर सुंदर आठवणींची
अगं
वाऱ्याची झुळूक आली कि मला तुझी आठवण येते ,
 पण सांग ना....कधीतरी तुला माझी आठवण येते ?

अगं

थकलेल्या मनात ,भिजलेल्या क्षणात मला तुझी आठवण येते,
पण सांग ना....कधीतरी तुला माझी आठवण येते ?

अगं
हक्काने कुणी ओरडले कि मला तुझी आठवण येते
सांग ना....कधीतरी तुला माझी आठवण येते ?

अगं
मनात रडून खोटे खोटे हसताना मला तुझी आठवण येते ,
सांग ना....कधीतरी तुला माझी आठवण येते ?

अगं
प्रत्तेक चित्राच्या रंगात मला तुझी आठवण येते ,
पण सांग ना....कधीतरी तुला माझी आठवण येते ?

अगं
आठवणींचा विषय जरी आला तरी पण मला तुझीच आठवण येते
पण सांग ना....कधीतरी तुला माझी आठवण येते ?


नसेन ग चांगला मी ,पण वाईट म्हणून पण का होईना

.....एकदा तरी माझी आठवण काढ.......


गरज आहे आज मला
तुझ्या त्या आधाराची
अडखळणारे पाऊल माझे
सावरणार्या त्या तुझ्या हातांची..


गरज आहे आज मला
त्या तुझ्या कोमल प्रितिची
भय दाटताच या मनी
आपलेपणा देणार्या त्या तुझ्या स्पर्शाची..



सारे जग असुरक्षीत वाटताच
तु जवळ आहेस या जाणीवेची
खरच गरज आहे रे आजहि मला....
तुझी....



माझ्या जीवनात अजुन
तुझी कमी वाटते....


प्रेम काय असत हे माहीत नव्हत,
प्रेमात कस पडतात ते माहीत नव्हत,
प्रेम हा मुळात आपला विषयच नव्हता,
मग त्यात पास होण्याचा प्रश्नच येत नव्हता..

तिच्या अबोल हसण्याला मी काय नाव देऊ,
डोळ्यातल्या भावनांना कसे जाणून घेऊ,
तिच्यवर खरेच प्रेम केले,
हे तिला पटवून कसे देऊ…

चंद्राचे चांदणे एकवेळ त्याला सोडून निघून जाईल,
माझे शरीर एकवेळ श्वास घेणे सोडून देईल,
पण माझ्या मनाच काय करू…
ते तुझ्यावर निरंतर प्रेम करत राहील…..

मला सोडून जातेस,
खुशाल निघून जा,
पण जाण्या अगोदर…
माझ्या मनावर कोरलेले तुझे नाव पुसून जा….

जीवनाच्या अनोळखी वाटेवर,
तू मला भेटलिस,
लाडीक हसून,
माझ्या मनात प्रेमाची कळी फुलवलीस

Friday, July 27, 2012



रोज तुझ्या डोळ्यात नव्याने रिमझिमणारा श्रावण मी
आठवणींच्या गंधफ़ुलांनी दरवळणारा श्रावण मी ..

आकाश पावसाचे ते रंग श्रावणाचे.. ओथंबल्या क्षणांचे

हिरवळलेल्या वाटेवरती एकटीच फ़िरताना
पाऊसओल्या गवतावरचे थेंब टपोरे टिपताना
तुझ्या मनाच्या हिरव्या रानी भिरभिरणारा श्रावण मी..

रंगली फ़ुगडी बाई रानात रानात
वाजती पॆंजण बाई तालात तालात

फ़ांदीवरला झोका उंच उंच गं झुलताना
हात तुझा मेंदीचा हळूच पुढे तू करताना
तुझ्या गुलाबी ओठांवरती थरथरणारा श्रावण मी..

पावसातले दिवस अपुले शोधतेस आज जिथे
तुझे नि माझे गीत कालचे ऎकतेस आज जिथे
तिथेच कोठेतरी अजूनही मोहरणारा श्रावण मी

अजूनीच त्या ठिकाणी ती श्रावणओली गाणी
माझी तुझी कहाणी..


भिजलेल्या डोळ्यातून आज, शब्द मनात उतरले
तिला पाहताच क्षणी, डोळ्यातून अश्रू बरसले.....

तिचीच आस धरून, आयुष्यात मी बिखरलो
नसताना ती जवळ, जगनेही मी विसरलो.....

तिचीच वाट पाहत, पापण्या माझ्या पाणवल्या
सावल्या डोळ्यातून ह्या, आभाळा सारख्या बरसल्या.....

खुप काही म्हणायच होता, शब्द माझे आतुरलेले
मुखातून न उमलता, डोळ्यातून उमललेले.....

म्हंटल जरा जवळ जाऊन, तिच्याशी थोड बोलाव
तिच्या आठवणीसंगे जगतो, तिलाही थोड कळाव.....

तिच्या आठवणीची ओंजंळ, तशीच भरून ठेवलेली
एकही क्षण न सांडवता, जिवापाड मी जपलेली.....

कंठ आज दाटून आला, तिला समोर पाहून
बरच काही बोलायच होत, मनात गेले शब्द राहून.....


इतकी नाजुक इतकी अल्लड, फुलपाखाराहून हळवार,
चालू बघता नकळत होते वार्या वरती अलगद स्वार,...........

भिजल्या देही गवाक्षतुनी चन्द्र किरण ते पड़ता चार,
लक्ख गोरटी रापून जाली रात्रीत एका सावळनार,...............

इतकी नाजुक........जरा निफेनी जोर देऊनी लिहिता नाव,
गालीत आली दुसर्या दिवशी अंगा अंगावर हळवे घाव,.........

इतकी नाजुक, इतकी सुन्दर, दर्पण देखिल खुलावातो,
ती गेल्यावरती, तो क्षण भर प्रतिबिम्बाला धरु बघतो,........

इतकी नाजुक की, जेव्हा ती पावसात जाऊ बघते,
भीती वाटते कारण जलात साखर क्षणात विरघळते,………

इतकी नाजुक की, आता तर स्मरणाचे भय वाटे,
नको रुताया फुलास असल्या माझ्या जीवनातील काटे …....इतकी नाजुक …….||
ती हसरं टपोरं गुलाब ,
जितकं नजरेत साठवावं ,
तितक अपूर थोड फार ...!!

ती पावसाची चाहूल देत ,
बेधुंद वाऱ्यावर नाचणारी मोर ,
लाजरी तरी बेभान वेडी पोर ...!!

ती पौर्णिमेचा पुर्णगोल चंद्र ,
असले हजारो डाग त्यावरी तरी ,
अस्सल सौंदर्य त्यातच दडलेलं ...!!


हिरवाई कंच दाटलेल्या पावसात
बहरून येते तू...
तुझ्यात बहरतो मी...
परमात्म्याचे मुक्त जीवनाचे दान
तुझ्या माझ्या हाताच्या ओंजळीत...

टवटवीत दवात हसते पालवी
उमलून गर्भ
जेंव्हा नवा जन्म घेतो....
अंग अंगास त्याच्या
माय मातीचा गंध येतो....

सोनेरी चंदेरी पखरण करणारा
आकाशीचा बाप
इंद्रधनुष्याचे स्मित देतो...
त्याचा अंश,अनंत थेम्बातून
रोमां रोमांत प्रवाहित होत जातो
आयुष्य असेच सरले, धावत आठवणींच्या पाठी
सबंध आयुष्य वाट पहिली, मी फक्त तुझ्यासाठी.....

तुझ्या येण्याची वाट पाहत, शब्द गोठले आज ओठी
ह्रुदयात दुःखाचे भास कवळले, मी फक्त तुझ्यासाठी.....

 जगलो असा की मी, जगणे राहून गेले पाठी
डोळ्यातले अश्रु ह्रुदयात कोंडले, मी फक्त तुझ्यासाठी.....

हर घडी तुझ्या प्रेमाची, मनात ठेवली आस मोठी
त्या आशेवर जगत राहिलो, मी फक्त तुझ्यासाठी.....


तुझ्याच समोर झुकते मन, हे मन ही आहे फार हट्टी
याच हट्टावर आयुष्य बेतले, मी फक्त तुझ्यासाठी.....

नाशिबाशी झगडत झगडत, न तोड़ता प्रेमाच्या गाठी
त्या गाठीना सामभालुन, ठेवले मी फक्त तुझ्यासाठी.....

एक एक क्षण तुझ्या प्रेमाचा, आज माझ्या डोळ्यात दाटी
त्या क्षणानना उराशी कवटाळले, मी फक्त तुझ्यासाठी.....


अंधार विजत उजेड यावा, भान विसरून जूळावि मीठी
याच स्वप्नांना आयुष्य समजलो, मी फक्त तुझ्यासाठी.....

तुझीच वाट पाहत, जळले ह्रदय प्रेमाकाटी
भिन्न दिशांना झुरत, राहिलो मी फक्त तुझ्यासाठी.......!!





 
मागून बघ जीव ही
नाही मी म्हणणार नाही
नको करुस माझ्या प्रेमाची खोडी

पुन्हा मी मिळणार नाही...


तुझा झालो तेव्हाच मी
माझ्यासाठी संपलो होतो,
प्रत्येक क्षण तुझ्यासाठी,
तुझ्या बरोबरच जगलो आहे..
श्वसांच्या प्रत्येक स्पंदणात
फक्त तुलाच तर जपले आहे,
मागून घे श्वासही, नाही मी म्हणणार नाही
नको करुस माझ्या प्रेमाची खोडी

पुन्हा मी मिळणार नाही...

तुझे माझे काय असते
कधी मला कळलेच नाही
तुझ्या शिवाय जगायचे
स्वप्न ही कधी मला पडले नाही,
मागून घे स्वप्नेही, नाही मी म्हणणार नाही
नको करुस माझ्या प्रेमाची खोडी
पुन्हा मी मिळणार नाही...

स्वर्ग सजवायचा तुज्यासाठी
म्हणून सार करत होतो
जमिनीवर उभे राहून
आकाशालही पकडत होतो
उघडून बघ मूठही, नाही मी म्हणणार नाही
नको करुस माझ्या प्रेमाची खोडी
पुन्हा मी मिळणार नाही....

ईतकेच सांगतो तुला ही
माझ्या शिवाय जमणार नाही
आणि तुझे ते तरफडणे
मी सहन करणार नाही
मागून घे अंतही, नाही मी म्हणणार नाही
नको करुस माझ्या प्रेमाची खोडी

पुन्हा मी मिळणार नाही...
पुन्हा मी मिळणार नाही...


ती जर मनात साठवत असेल
तर तु मुळीच काळजी करु नकोस

भावनांची अशीच साठवण होईल
नी एक दिवस मनात आभाळ दाटुन येईल

मग तुझ्या आठवणीच्या हळुचश्या झुळुकेनेही
मन तिचे नुसते सैर-भैर होऊन उठेल

नजर बेभानपणे तुझाच शोध घेईल
नी तुझ्या घट्ट मिठीत विसावुन
पाऊस तिच्या नजरेतुन बरसेल


आज आत ही केवढी तगमग
किती दाटून आलेत ढग
तरी एकही थेंब न पडणे
मुकेच आज का आतले गाणे

तुझे असणे, तुझे नसणे,
ह्यावरच का सारे जगणे ?
कधी कोसलेले पाउस ?
एकदा तरी मनापासून
कधी जाणवेल ओल
कुठेतरी आतपासून ?

कधी अन्कुरणार बीज
एकदातरी रुजण्यासाठी ?
कधी उमलणार कुणी
एकदातरी फुलण्यासाठी ?
होता एक वेडा मुलगा,
तिच्यावर खुप प्रेम करायंचा,
आठवण तिची आल्यावर,
कविता करत बसायचा . . . .

कधी तिच्या केसात गुंतायचा,
कधी तिच्या डोळ्यात बुडायचा,

कधी तिच्या ओठांवर अडकायचा,
तर कधी गालावरगोड हसु आणायचा....

नेहमी काहीना काही उपमा द्यायचा,
आज परी तर उद्या सरी . . . .
प्रेम फक्त तोच करतो असे काही वागायचा....

पेनाची शाई संपली तरी शब्द संपेना,
त्याच्या कविता तिला हट्टाने दाखवायचा,

कवितेतील तीच तू अशी जाणीव मात्र द्यायचा....
कविता तिला आवडली की वही मागे चेहरा लपवून,
खुप गोड हसायची....


एक आठवण म्हणुन,

एक समाधान म्हणुन,

होता एक वेडा मुलगा,
तिच्यावर खुप प्रेम करायंचा.


आज अचानक भल्या पहाटे
एक आठवण जागवून गेली
तुझे आणि माझे बंध
आपसूकच दाखवून गेली

सांग ना !
काय तुझे आणि माझे नाते
उमजेल का, कधी मला ते

करून करून विचार जेव्हा
कधी नव्हे ते थकलो
गालांवरचा पाऊस मी
थांबवू नाही शकलो

मॆत्रीचे हे नाते अपुले
का आज एकतर्फी वाटले
पहाटेच्या या ऒल्या शणी
का कातरवेळ्चे ध्यास लागले

का तुझ्या डोळ्यात आज
शोधतोय मी पाऊस गाणे
धुक्याच्या या ओंजळीमध्ये
प्रेमरूपी दव थेंब माझे

सापडेल का या शणांना
कधी एक गोड किनारा
गालांवरच्या पावसाला
सावरणारा एक जिव्हाळा
सावरणारा एक जिव्हाळा"


मलाही तुला मिठीत घ्यायचे होते
तुझा बाहुत डोके टेकवून झोपायचे होते
पण मला कधी जमलेच नाही

ओठ तुझे ओठात घेवून अमृत मलाही पियायचे होते
तुझा प्रेमाच्या सागरात खोलवर जायायचे होते
पण मला कधी जमलेच नाही

तुझा त्या दु:खात मलाही विरघळायचे होते
गालावरून ओघळणा-या अश्रूंना ओठांनी टिपायचे होते
पण मला कधी जमलेच नाही

पावसात तुझासोबत मलाही भिजायचे होते
हात तुझा हातात घेवून दूरवर चालायचे होते
पण मला कधी जमलेच नाही


शब्दांच्या या दुनियेत, मन माझे रमत नाही
कविता करायला, हल्ली कविताच सुचत नाही....!!!

शब्दांच्या प्रवासात
ओळ काही मिळत नाही,
वेचली अनेक शब्द फुले
पण शब्द शब्दाला जुळत नाही

खेळ हा शब्दांचा, मनाला कळत नाही,
कविता करायला, हल्ली कविताच सुचत नाही....!!!

रचल्या शब्दांच्या ओळी,
पण यमक काही जुळत नाही,
लिहिलेल्या कवितांना मग
अर्थ काही उरत नाही,

कशी आहे हि वेळ, सरता सरत नाही,
कविता करायला, हल्ली कविताच सुचत नाही....!!!


का बरं मला तुझी आठवण यावी...?
जीवाची अशी घालमेल व्हावी....?
सारं काही जवळ असुनही,
दूर असल्याची जाणीव व्हावी.....?

आठवताहेत ते क्षण,
जांच्यावर जगतेय अजुनपण,
सतत तुला माझ्याकडे आणि माला तुझ्याकडे,
खेचणारे असे हे क्षण

आठवतेय तो सारा पसारा,
जो, पसरलाय सैरावैरा,
त्यातूनच तुझा तो इशारा,
तेव्हा अंगावर आलेला शहारा...,

एवढे सर्व असुनही,
का बरं मला तुझी आठवण यावी...?
जीवाची अशी घालमेल व्हावी..........!

आठवतेय तुझं चिडणं - रागावणं,
मग स्वत:च बोलणं,
नाहीतर दोन - चार दिवस थांबून,
मी बोलतेय का हे बघणं......!

वाटतं ही वेळ अशी,
चुटकित सरून जावी,
आणि शेवटी कायमची,
आपली गाठभेट व्हावी.......!


असाच कधीतरी येउन जा, फुल तुझ्या आठवणीची घेउन जा.

खुप सुगंधित करून ठेवलय त्याना, हृदयाच्या कप्प्यात भरून ठेवलय त्याना,

असाच कधीतरी स्वारी करून जा, माझ्या प्रेमाची किमत घेउन जा,

त्या आठवणीना असच उजलू दे, सघर्षमय या जीवनात सोन त्याच होऊ दे,

हतबल असा होऊ नको रे ते क्षण त्या आठवणी तुझ्याच होत्या, हे जगाला दाखउन दे......,

तुझ्या भावनांचा स्पर्श माझ्या भावनाना होताच, अगदी पाण्याहुन वीरघलुन गेला रे.....,

तू दिलेल्या जखामाना ताज करून गेल्या रे.....,

किती लिहू रे तुला, जगाइतका कागद केला, पाण्याइतकी शाई केली,

तरी त्या प्रेमाची महती संपणार नाही, आणि कुणाला त्याची किमत कळणार नाही,



आलाच आहे आयुष्यात, तर शेवटपर्यंत साथ दे !

हातात माजा प्रीतिचा नेहमीच, तुजा हात दे !

क्षण विरहाचे विसरून आता, मिलनाचे वेध दे !

तुज्या ह्रदयात माज्या प्रीतिची, कली अशीच उमलू दे !

माज्या श्वासात तुज्या सुगंद्याची, जाणीव माला होऊ दे !

नजरेत तुज्या फ़क्त मला, माजी प्रतिमा पाहू दे !

मनात तुज्या नेहामिसाठी, फ़क्त मलाच राहू दे !

आलाच आहे आयुष्यात, तर शेवटपर्यंत साथ दे !

मी दुसर काहीच मागणार नाही, फ़क्त प्रीतिचा हात दे !


उफाळलेल्या समुद्रामधे,
संथ बुडणाऱ्या सूर्याकडे, एकटक पाहतांना.....
मनात असंख्य कल्लोळ.....

कल्लोळ!!!!
कधी विचारांचे, कधी आठवणींचे....
आणि कधी पापणीआड दडलेल्या,
ओलेत्या साठवणींचे.......

भिजलेल्या पापणीसवे , गंधाळलेले श्वास.....
आणि प्रत्येक श्वासानिशी, तुला भेटण्याची आस.....

तुझ्या-माझ्या भेटी आठवल्या कि,
उर्मी दाटते, ती पुन्हा तुला भेटण्याची.....
आणि नेमकी तेव्हाच.... नेमकी तेव्हाच शक्यता असते,
अशी जीवघेणी कातरवेळ गोठण्याची.....

कातरवेळ गोठली ना, कि जीव कासावीस होतो ग .....
मग तुझ्या आठवांनी..... आणि माझ्या आसवांनी.... जळत राहते रात्र तशीच....
आणि पहाट होता-होता...
पहाट होता-होता, श्वासांच्या ठिकऱ्या तेवढ्या, उरतात मात्र ओंजळीशी.....
उरतात मात्र ओंजळीशी....

ती म्हणते की......


डोळ्यांत तुझ्या पाहिलं की......
आरश्यात पहावसच वाटत नाही.......
हृदयात तुझ्या राहते मी.......
आत्ता घरी रहावसच वाटत नाही.......!!

गालावरची खळी पाहिली की......
हसू थांबावच वाटत नाही.......
खुप आनंदी असलास की.......
आनंद ओसरावाच वाटत नाही.......!!

जवळ असलास माझ्या की.......
तुझा सहवास नसावाच वाटत नाही......
खुप करतोस प्रेम माझ्यावर......
माझं प्रेम आटावसच वाटत नाही.......!!

तुझी आठवण येणार नाही.......
असा दिवस यावासाच वाटत नाही......
चांदण्या रात्रीचं रम्य स्वप्न.......
स्वप्न तूटावसच वाटत नाही......

आठवण म्हणजे...


आठवण म्हणजे नक्की
काय भानगड असते?
प्रत्येकाच्या मानामध्ये
का घर करुन बसते?

आठवण असते...
कधी तिखट कधी गोड
कधी लहान कधी थोर,
कधी व्यक्त कधी अव्यक्त
कधी दु:खी कधी आनंदी.

आठवण असते...
आईचा हात धरुन
दुडू दुडू पळणारी,
बाबांच्या खांद्यावरुन
सारं गावं फ़िरणारी.

आठवण असते...
वर्गामधल्या मित्राची
हळूच खोडी काढणारी,
शाळेला दांडी मारुन
चिंचा बोर खाणारी.

आठवण असते...
बावरलेल्या नजरेनं
कॉलेजकडे पाहणारी,
कट्य़ावरच्या गप्पांमधे
तासनतास रमणारी.

आठवण असते...
तिच्या लाज-या स्मीतासाठी
दिवस रात्र झुरणारी,
मनातल्या भावना तिला
सांगायला घाबरणारी...

आठवण म्हणजे...
गतकाळाच्या क्षणांची ती
गोड साठवण असते,
प्रत्येकाच्या आयुष्याला
सुवर्ण कोंदण असते.


"मी रोज अनुभवतो तिला....

प्रत्येक लयबद्ध गाण्यामधे,
आणि,
जाणवतो मला तिचा निखळपणा ओल्याचिंब पावसाच्या पाण्यामधे.

मी रोज अनुभवतो तिला....

गुलाबाच्या पाकळीच्या स्पर्शामधे,
कित्येकदा पाहिलय तिला अंधारात उभ त्या निष्ठुर निशब्द आरश्यामधे.

मी रोज अनुभवतो तिला....

मोगऱ्याच्या गर्द सुवासामधे,

मखमली मिठीत सापडतो तिच्या प्रत्येक बेधुंद श्वासामधे.

मी रोज अनुभवतो तिला....

शब्दासारख माझ्या आठवणीच्या प्रत्येक पानावर.
हे असच
तिला बोलावून घेतो जेव्हा दडपण येत वेड्याच्या मनावर...."
कोणास ठाऊक का ?


कोणास ठाऊक का ?
मलाही कविता करावीशी वाटते ,
शब्दच सुचत नाहीत
तरीही कविता लिहावीशी वाटते .

कोणास ठाऊक का ?
मलाही लेखक व्हावस वाटत ,
आयुष्यातलं प्रत्येक पान
माझ्या पुस्तकामध्ये उतरवास वाटत .

कोणास ठाऊक का ?
मलाही पाखरू व्हावस वाटत ,
आभाळातल्या त्या माळरानात
मोकळेपणाने उडावस वाटत .

कोणास ठाऊक का ?
मलाही थोड थांबावस वाटत ,
लहानपणीच्या त्या आठवणीत
आईच्या कुशीत शिरवास वाटत .

कोणास ठाऊक का ?
मलाही शांत झोपावास वाटत ,
मारणा नंतरचं आयुष्य
एकदा जवळून पहावास वाटत .

कोणास ठाऊक का ? ................................


परवा अचानक एक कविता सुचली. आता कविता अचानकच सुचतात हे ही खरंच! पण ही कविता मात्र वेगळी आहे. मला मुलीच्या दृष्टीकोनातून सुचलेली…

तू हवा होतास…

मन बरसताना माझे तू हवा होतास.
ओल्या ओठांवरल्या दवाला तू हवा होतास.

ढगांचा गडगडाट, मनाचा हिंदोळा,
अंगावरचा शहारा, तुझ्यासाठी थांबला होता.
उबदार कवेत घ्यायला तू हवा होतास.

पावसाळ्यातला एकटेपणा, निसरडी माती,
उडणारा पदर तुझ्यासाठी थांबला होता.
वाहणारे ओहोळ सावरायला तू हवा होतास.

हिरवाई सगळीकडे, झाडं वाढलेली चिकार,
काट्यात झुलणारा गुलाब तुझ्यासाठी थांबला होता.
त्याच्या सुवासाला तू हवा होतास


अधीर ओठ टेकता जरी शहारतेस तू
मिठीत या सखे अशी कशास लाजतेस तू!

फुलून पारिजात हा उभा तुझ्याच अंगणी
उगाच लाजतेस अन सुवास टाळतेस तू

तुला न पाहता उनाड चंद्रही न मावळे
कशास 'चांदणे कुठे' असे विचारतेस तू?

अता कुठे जरा जराच रंगतेय ही निशा
अशात हाय कुंचलाच दूर सारतेस तू

सखे तुझ्या मिठीतलाच मागतोय स्वर्ग मी
कुशीवरी अशी फिरून पाठ दावतेस तू

Thursday, July 26, 2012

सांगू तुला कसे
शब्दही सुचेना

न सांगताच सारे
समजेल का तुला

बोलायचे खुप आहे
शब्द जुळत नाही

... अवचित होणाऱ्या भेटीत
वेळ पुरत नाही

अवघड आहे सांगणं
तुच समजुन घे ना

वाच माझ्या मनातलं
देऊन नजर नजरेला

कधीकधी विचार करतो
सांगू तुला कशाला

कळेलच तुला
भाव माझ्या मनातला

प्रश्न न विचारता
उत्तर मला देशील का

कसं रे सांगु तुला
मी तुझाच विचार करते,
धुंद तुझ्या मिठीत
मी स्वत:लाच हरवते.

... बोलणे तुझे ते मधाळ
... मी माझा राग ही विसरते,
बाहुपाशात मग तुझ्याच
अश्रुनां मोकळी वाट मिळते.

सांत्वन करता करता तू
मला स्वंत:मध्ये गुंतवतोस,
नकळत मग माझ्या
देहाशी खेळत बसतोस.

जादू तुझ्या स्पर्शातील
अशी माझ्यावर चालवतोस,
करुन मनाला बेधुंद
अवधे विश्वच माझे व्यापतोस.

नसतो तुझ्याशिवाय मला
दुसरा कसलाच ध्यास,
सांग ना रे तुच, का होतात?
स्वप्नांत मला हे असले भास...!!!!!


काय मस्स्त पाऊस पडतोय .....!!!
पाऊस सारखा बडबडतोय.........!!
नाव तुझे घेताना,,,,,
नेमका अडखळतोय......!!
... काय मस्स्त पाउस पडतोय .......!!!

कधी दंवाचे......कधी थेंबांचे .......
कधी झाडावरती गारठून...
थरथरनाऱ्या पानांचे ....!
पाऊस गाणे गातोय..........
काय मस्स्त पाऊस पडतोय .......!!

नकळत घेतोय.....ताबा...मना वरती ...
अन रिप रिप करतोय ....
अलगद कानांवरती....!!
बाहेर कोसळत असला तरी........
माझ्या मनात धडधडतोय....
काय मस्स्त पाऊस पडतोय ......!!!

सांगतोय कधीचे.......नवे जुने बहाणे.....
कधी जुन्या आठवणी...कधी उद्याचे गाणे.....
बेसूर या जगण्याला....
सुरात गुंफतोय.........!
ओल्या चिंब वाटावरती......
नुसता सळसळतोय......!!
काय मस्स्त पाऊस पडतोय....!!

आता येशील तू.........प्रत्येक क्षणी वाटत.....
माझ्याही नकळत.....आभाळ मनात दाटत.....
मी उभा आहे तुझ्यासाठी
भिजत पावसात...........
ये परत लवकर....
होण्या आधी रात.....!!
हं...नेमका साला पाऊस...
मधेच कोलमडतोय ......!
काय मस्स्त पाऊस पडतोय.......!!!

काय मस्स्त पाऊस पडतोय.........
पाऊस सारखा बडबडतोय.........!!
नाव तुझे घेताना ,,,,,,,,,,,
नेमका अडखळतोय......
काय मस्स्त पाऊस पडतोय.........!!!
क्षणात येता पाऊसधारा,
गडगडले मेघ अंतरी...
प्रेमवर्षा बरसवण्या,
आसुसले मन तुझ्यावरी... खिळल्या नजरेत नजरा,
नि:शब्द ओठ जरी,
हिरमुसलेला अल्लड वारा,
प्रीत आपली सावरी, प्रेमसागर खळाळणारा,
भावनांचे मनात मंथन....
स्पर्श तुझा भिजवणारा,
दे तुझ्या बाहूंचे बंधन.... थेंब ओघळणारा,
... माझ्या गालावरी,
ओठाने तुझ्या टिपून घेता,
आला शहारा अंगावरी.... प्रेम घन ओथंबणारा,
बरसू दे माझ्यावरी....
हृदयात मज
विसावू दे निरंतरी...


तुझी माझी प्रित
राधा कृष्णाची रास व्हावी
वेणू च्या नादी तुझ्या
माझ्या पैंजणांची छूमछूम झंकारावी.

तुझी माझी प्रित
राम सितेचा आदर्श व्हावी
वनवासातील पर्णकूटीलाही
तृप्ततेची झालर झळकावी.

तुझी माझी प्रित
गौरी-शंकरासम पुण्य व्हावी
हिमालयाच्या शिखरावरही
तुझी माझी प्रित नांदावी.

तुझी माझी प्रित
विठोबा-रखूमाई भोळी
वसून स्वतंत्र मंदीरी
जय जय विठोबा-रखुमाई गर्जावी.


तुझी माझी प्रित जणू, देव्हा-यातील समई
न तळपता तम दुर करूनी, संथ प्रकाश देई

तुझी माझी प्रित जणू, सुगंधी सोन चाफा
माथी भरा, हारी गुंफा,चिरकाळ सुगंधी ठेवा

तुझी माझी प्रित जणू, सागरीच्या लाटा
एकमेकांना गाठता, अतुट मिलनी भेटा


प्रेम म्हणजे ..........
एकमेकांच्या नजरेत समावने असते .

प्रेम म्हणजे ..........
एकमेकांची कलजी घेणे असते ...

प्रेम म्हणजे ....
एकमेकांचा आदर करणे..

प्रेम म्हणजे ....
एकमेकांच्या सुख दुखात साथीदार होणे ...

प्रेम म्हणजे ....एकमेकांच्या विरहत रात्र रात्र झुरने ...
प्रेम म्हणजे ....तुझे माझे नसून सारे आपले असने ....

अन ....,

प्रेम म्हणजे ...
दुरावा नको म्हणून ,
एकमेकांच्या घट्ट मिठीत विसवने.... ♥ ♥ ♥


ती : माझ्यात तो : तुझं स्वतःचं असं काहीच नाही आवडत मला....पण " तुझ्या मनातला मी " आवडतो मला...

ती : किती प्रेम करतोस माझ्यावर....??
तो : हे माझ्या हातातलं हिरवं पान दिसतंय?त्या पानावर जितक्या हिरव्या शिरा आहेत न तितकंच प्रे...म करतो. जास्त नाही. ...

ती : मला कधी विसरशील..??
तो : एकदम सहज विसरेन....हा आकाशातला सूर्य उगवायचाथांबला ना कि विसरेन....

ती : कधी आठवशीलमला..??
तो : आठवण सारखी सारखी का काढू ? कधी तरीच काढेन... पापण्यांची उघडझापकरतील ना तेव्हाच काढेन....

ती : तुझ्या सोबत राहिल्याने मला काही तोटा होईल का...??
तो : तोटा तर आहेच...माझ्या सोबत राहिलीस तर तुला तुझं दु:ख कधीचएकटीला अनुभवता येणार नाही. त्यात अर्धा हिस्सा नेहमी तुला माझ्यासाठी काढून ठेवावा लागेल. ... ♥
 काय आवडतं..???
तो : तुझं स्वतःचं असं काहीच नाही आवडत मला....पण " तुझ्या मनातला मी " आवडतो मला...

ती : किती प्रेम करतोस माझ्यावर....??
तो : हे माझ्या हातातलं हिरवं पान दिसतंय?त्या पानावर जितक्या हिरव्या शिरा आहेत न तितकंच प्रे...म करतो. जास्त नाही. ...

ती : मला कधी विसरशील..??
तो : एकदम सहज विसरेन....हा आकाशातला सूर्य उगवायचाथांबला ना कि विसरेन....

ती : कधी आठवशीलमला..??
तो : आठवण सारखी सारखी का काढू ? कधी तरीच काढेन... पापण्यांची उघडझापकरतील ना तेव्हाच काढेन....

ती : तुझ्या सोबत राहिल्याने मला काही तोटा होईल का...??
तो : तोटा तर आहेच...माझ्या सोबत राहिलीस तर तुला तुझं दु:ख कधीचएकटीला अनुभवता येणार नाही. त्यात अर्धा हिस्सा नेहमी तुला माझ्यासाठी काढून ठेवावा लागेल. ... ♥

♥ Love is always Sweet.., isn't it......???? :) ♥
Photo: एकदा पुन्हा हरवली सख्या मी तुझ्यात,
रुजवून तुझी प्रीत मनात,
काल रात्री पुन्हा बघितले मी तुला... स्वप्नात,
प्रीतीची मागणी घालताना... घेउन माझा हात हातात...♥
 
तो आणि ती...
आज परत भांडले दोघं...
ती रागवली अन रुसून बसली...
ती रागवल्यावर इतकी छान का दिसते हे त्याला न सुटणार कोडं...

तीही मग मुद्दाम रुसून बसते...
... तो ही थोडावेळ चिडचिड करतो...
पण ती रुसली म्हटल्यावर त्याची नीट चिडचिडही होतं नाही...
मग तो उगाच तिला आवडेल असं काहीतरी करतो...
उलटसुलट बडबडतो... वाकडेतिकडे चेहरे करतो...
मग असंच कुठल्यातरी एका क्षणी ती खुदकन हसते...

तिच्या त्या रागवल्यानंतर जास्त छान दिसण्याच कारण-

"कोणीतरी " आपलं " आपल्याला मनवण्यासाठी हे सगळं करेल हा ' विश्वास ' !!!! ती मुळात भांडतेचं त्यासाठी

गोजिर्‍या रे माझ्या फुला




गोजिर्‍या रे माझ्या फुला,
सांगु कसे रे मी तुला.
न कळे तुला नयनांची भाषा.
न येते मला अधरांची भाषा.
मग सांगणे मज जमेल का?
न सांगता तुज कळेल का?
का हे दिवस असेच सरतील.
कुशीत माझ्या लाडके दुःख उरतील.
आणि हासत मी हा विरह प्राशिला.
गोजिर्‍या रे माझ्या फुला.


प्रित
जेव्हा तुझी नी माझी अशी प्रित झाली,
दोन वेगळ्या तनूंची एक वेल झाली.
कळले मला न काही.
कळले तुला न काही.
कळण्यासारखे आणि,
उरले आता न काही.
भर उन्हात कशी ही पावसाची सर आली
दोन वेगळ्या तनूंची एक वेल झाली.
जेव्हा तुझी नी माझी अशी प्रित झाली.
माझी कविता

तुझ्याशी संवाद म्हणजे
एकप्रकारे शाब्दिक प्रणयच.
आणि या प्रणयमालेतुन
जन्माला आलेली अपत्य,
म्हणजेच माझी कविता.........

Wednesday, July 25, 2012

प्रेम कस असत
वाटलं तुम्हाला ते तस असत
कधी डोळ्याची भाषा म्हणजेप्रेम असत
कधी डोळ्यातील अश्रू म्हणजे प्रेम असत
प्रेम कधी रुसत प्रेम कधी फुगत
प्रेम कधी हसत आणि असच प्रेम
... मनात जावून बसत सुधा
प्रेम कधी काटेरी झुडूप असत
प्रेम कधी थंड हवेची झुदुक असते
गडगडणार्या आभाडत सुधा प्रेम असत
सरींच्या पडणार्या प्रत्येक थेंबात
सुधा प्रेम असत
कोणी आपल्यासाठी असंन आपण
कोणासाठी असंन
आपण आपले असून सुधा आपले नसणं म्हणजे
प्रेम प्रेम कस असत ...♥
दूर कुठेतरी समुद्रकिनारी
हातात हात घालुन बसायचय मला,
आकाशातील तारकांकडे बघताना
भविष्याचे हितगुज करायचय मला,
आयुष्यात प्रेम करायचय मला ...
माझ्या मांडीत डोक ठेऊन
तिला झोपी गेलेल पहायचय मला,
तिच्या शांत चेहेऱ्याकडे पहाताना
स्वतःशी स्मित करायचय मला
आयुष्यात प्रेम करायचय मला ...
... तिच्यासोबत थोड दुष्टपणे वागुन
तिला रागाने लालबुंद करायचय मला
तिची आसवें पुसता पुसता पटकन मिठीत घ्यायचय तिला
आयुष्यात प्रेम करायचय मला ...
आयुष्यातील तिचा हिमालय
तिच्या बरोबरीने चढायचाय मला
शिखरावर पोहोचताना माझ्या सोबतीच आनंद
तिच्या डोळ्यातुन व्यक्त झालेला अनुभवायचाय मला
आयुष्यात प्रेम करायचय मला ...
ति माझ्यापासुन दुर जात असताना
विरहाच्या कल्पनेने खिन्न व्हायचय मला
ति नसल्यामुळे होणाऱ्या वेदनांना
डोळ्यावाटे मुक्त करायचय मला
आयुष्यात प्रेम करायचय मला.......................
भेट तुझी नाही झाली,
तर आठवणींचे धुके दाटते,
सांग ना रे सख्या असे नेहमी,
माझ्यासोबतच का घडते?,
तू असला सोबत की,
... मन खळखळून असते,
... तू नसला समोर की,
आठवणीत तुझ्याच रडते..
सांग ना सख्या असे नेहमी,
माझ्यासोबत का घडते?
एकदा त्याने समजावे हे सगळे,
म्हणूनच तर मी लिहिते,
त्याला दिसून पण दिसत नाही,
याचेच दुख मला वाटते....!!!!!

आवडेल मलाही पाऊस व्हायला…
आवडेल मलाही पाऊस व्हायला…
न सांगता तुझ्या भेटीला यायला …
धुंद होऊन तुझ्यावर बरसायला…
केसांमधून पाठीवर हळुवार ओघळायला…
अंगावरच्या काट्यांची वाट तुडवायला…
... आवडेल मलाही पाऊस व्हायला …
आवडेल मलाही पाऊस व्हायला …
गंध होऊनी श् ‍वासात तुझ्या मिसळायला…
श्‍वासातल्या उबेत मनसोक्त डुंबायला…
काळ्या ढगांमधून पळून यायला…
अलगद तुझ्या कुशीत शिरायला…
आवडेल मलाही पाऊस व्हायला …
आवडेल मलाही पाऊस व्हायला …
नकळत हृदयात तुझ्या शिरायला …
हृदयात मेणाचं एक खोपडं बांधायला ..
तुझ्या स्वप्नात येऊन तुला जागवायला..
काळजाचा तुझ्या वेध घ्यायला …
आवडेल मलाही पाऊस व्हायला …
आवडेल मलाही पाऊस व्हायला …
हातात हात घालून तुझ्या रानोमाळ हिंडायला…
पंखात तुला घेऊन भरारी घ्यायला…
आठवण बनून तुझ्या डोळ्यात उतरायला…
अश्रूंमध्ये आनंदाची साखर मिसळायला…
आवडेल मलाही पाऊस व्हायला …
आवडेल मलाही पाऊस व्हायला…
एकट्या मनाची सोबत करायला …
कोणाच्यातरी चेहऱ्यावरचं हसू व्हायला…
भाळशील का तू माझ्या या रुपाला
सांग ना जमेल का तुला साथ द्यायला…
तरच आवडेल मला पाऊस व्हायला…



मला फक्त तूच आवडतेस

मला फक्त तूच आवडतेस, माझ्या मनात फक्त तूच बागडतेस...

तुझ्यशिवाय दुसऱ्या कोणाचा विचार मी करत नाही, या हृदयाची घंटा फक्त तूच वाजवतेस...

... जेंव्हा प्रथम तुला पहिले तेंव्हाच मी तुझ्या प्रेमात पडलो, आता तर तू माझेच जीवन होऊ पाहतेस...

तुझ्या निरागस चेहऱ्याकडे पाहून दुख मी सगळे विसरतो, आठवण यावी कधी त्यांची मात्र तूच मला सावरतेस...

कधीकधी भीती वाटते दुरावशील मजपासून, हे वाटून तूच मला धीर देतेस...

तुझ्या स्पर्शाची आस मला लागून राहते रोज रोज, तू मात्र भेटण्यासाठी गुपचूप निघून कधी मधीच येतेस...

काय म्हणावे माझ्या या वेड्या प्रेमाला, तू मात्र हसून मलाच वेड्यात काढतेस...

पण काय करू तुझी धुंदच अशी की व्यसने बरी म्हणायची पाळी तू आणतेस...

आता कित्येक दिवस झाले प्रेमाचे दोर बांधून, पण रोज एक धागा नव्याने तू विनतेस...

प्रेमात अखंड बुडाल्याचे निस्सीम तू मान्य करायला लावतेस, तुझ्याचसाठी मी जगतोय हे मला तू सारखे सारखे म्हणायला सांगतेस...
देव पण न जाणो कोठून कसे नातेजुळवितो..,
अनोळखी माणसांना हृदयात स्थान देतो..,
ज्यांना कधी ओळखतही नसतो..,
त्यांना पार जिवलग बनवतो.. ♥

प्रेम म्हणजे जन्मो जन्मीचे अतूटनाते ,
जे मुक्या भावनांच्या शब्दात जगतराहते ....
प्रेम म्हणजे जणू थंडीतला बेधुंदगारवारा,
प्रेमाचा स्पर्श होताच अंगावर येणाराशहारा....

स्वता मी काही लिहिले
आसे मी म्हणत नाही
तू सुचविते तेच उत्रवितो
बाकि काही करीत नाही
आठवणीत तुझ्या रमताना ,
तुला आठवत फिरताना
... स्वताच स्वताशी केलेली
बडबड कागदावर उत्रवितो
तू सुचविते तेच लिहितोबाकि काही करीत नाही
कधी तू हसत हसत
समोर येतेस आणि
ऐक सुन्दर रोमाँटिक
कविता तयार होते
तर कधी तु स्वप्नाळू
बनुन मिठीत शिरते
आणिसहज शिळ
घालत कविता बनते
जेव्हा आश्रू तुझ्या
डोळ्यातून बरसतात
विरहाचे गीत
स्पन्दनातुन वाहतात
सर्व जर तुझेच आहे
तर मी स्वताला परका कसे म्हणु
तू सुचविते तेच उत्रवितो
बाकि काही करीत नाही

एकामेकांना भॆट्ण्य़ाची दोघानाही आस आहे
आपल्या मैत्रीमध्ये हीच एक गोष्ट फ़क्त
खास आहे
इन्द्र्धनुष्याच े रंग आहेत
आणि पारिजातकाचा वास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे
... मी म्हणजे जीवन आणि तु म्हणजे श्वास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे
संकटांची नाही भिती,
तुझ्या मैत्रीचा विश्वास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे
कधी वाटते फक्त तुझी मैत्री सच्ची,
बाकी दुनिया नुसता आभास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे
हवे काय अजुनि त्याला, मित्र तुझ्यासम
ज्यास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे
ओढ तुझ्या सावलीची माझिया रस्त्यास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे
असो वा नसो कुणी आपल्या संगे,
पर्वा त्याची कुणास आहे
आपल्या मैत्रीमध्ये मित्रा बरेच काही खास
आहे
माझ्या चुकांवरही मित्रा पांघरूण तुझे
हमखास आहे
आपल्या मैत्रीमध्ये मित्रा बरेच काही खास
आहे
तुझ्याबरोबर ऐन
उन्हाळा ही मजला मधुमास आहे
आपल्या मैत्रीमध्ये मित्रा बरेच काही खास
आहे
सगळ्यांपेक्षा वेगळी तु नक्किच आहेस. .
पाण्यापेक्षाही खळखळूण तुझ हसण आहे..
फुलापेक्षाही नाजुक तुझ बोलण आहे..
स्वपनांपेक्षा सुदंर तुझ दिसण आहे..
पण त्यापेक्षाही सुदंरतुझ
माझ्या आयुष्यात असणं आहे…….
... काचेहुन ही निर्मळ तुझ मन आहे..
बाणां पेक्षा ही धारदार तुझे नयन आहेत…
मधा पेक्षा ही मधाळ तुझी वाणी आहे…
पण त्यापेक्षाही सुदंरतुझ
माझ्या आयुष्यात असणं आहे…
शब्दांपलीकडे
हि काही भावना असतात,
सगळ्याच
काही बोलायच्या नसतात...
मनात खोल कुठे
... तरी लपवायच्या असतात,
... काही पुड्या एकांतातच
खोलायच्या असतात...
चंद्राकडे ही कधी तरी एकटक
पहायचं असतं,
मोकळ्या आभाळाखाली कधीतरी एकटचं
रहायचं असतं....
कधी कधी आपलं कुणीच नसतं,
तेव्हा स्वतःकडेच स्वत: रडायचं
असतं....
कधी कधी डोळ्यांतूनच हलकं
व्हायचं असतं
गुदमरण्या पेक्षा रडणं नेहमीच
बरं असतं...


प्रेमाचा बहर असा की,
ऋतु त्याला कुठला नसतो

एखादा मुखडा अवचित
... चंद्राहून सुंदर दिसतो

भक्ताला देव कसा तो
जागी स्थळी कुठेही दिसतो :-)

प्रिय साजणं समोर नसता
अंतरी जसा मग स्मरतो :-(

डोळ्यांत ऊतरते धुंदी
प्रेमाचा कैफच न्यारा

हरवून जाय स्वता:ला
ति प्रेमिळ सैरभरारा

स्मरताना मग सजणाला :-)
मन हरवून सगळे जाते

जग नेहमीचेच अचानक
मनमोहक सुंदर होते..... :-)

 
न सांगता कळणारे, अन कळून हि न
सांगता येणारे...
असे हे प्रेम असते...
डोळ्यात नेहमी दिसणारे,पण
वाचता न येणारे...
... असे हे प्रेम असते...
... काळजीतून कळणारे,पण कळूनही न
वळणारे...
असे हे प्रेम असते...
कधी कधी बोलून हि न
मिळणारे,अन कधी कधी न
बोलतास आपलेसे करणारे...
असे हे प्रेम असते...
जीवाला जीव लावणारे,अन
कधी कधी जीवासाठी जीव
हि देणारे..
असे हे प्रेम असते...

Tuesday, July 24, 2012

~ Just three little words
don't seem like enough
for someone whose smile
brightens my day,
someone whose touch
can make me forget the rest of the world.

They don't seem like enough
for someone who's always been there
to celebrate with me
when everything goes my way
and to hold my hand
when my whole world
seems to fall apart.

But even though "I Love You"
can't express the depth
of my feelings for you.
I hope you know what's in my heart.
Because loving you
means more to me
than anything in the world
and it always will...♥♥♥
 
Photo: It's not hard to find someone
who tells you they love you.
It's hard to find someon
who actually means it...
:
:
♥
(MukZ)
 
When I hear your name, I want to
listen..
When you're around, I want you
to see me..
When you look at me, I want you
to smile..
When you talk to me, I want to be
there forever..
When life gets tough, I want to be
there, in your arms and thinking
that everything is going to be just
fine...
Baby, I want you.

It Feels Nice When You Know That Somebody is Worried About Your Sadness & Happiness ...♥
If I Could Have Just One Wish
I Would Wish To Wake Up Everyday
To The Sound Of Your Breath On My Neck
The Warmth Of Your Lips On My Cheek
The Touch Of Your Fingers On My Skin,


Photo: If I am WrOng , I Need YOur Hand TO Correct Me....

If I am LOst , I Need YOur Hand To Guide Me....

If One Fine Day I Die, I still Need YOur Hand To ClOse My Eyes.

S0. . . .
Please hold my hand tightly in your hand .. !!
You Are The Beat of My
Heart ......♥

You Are The Love of My
Life ....♥

...
I Promise I Will Always Love You Till My Last Breath ....♥

I Promise I Will Never Leave You Alone ....♥

I Just Wanna Spend Ma
Whole Life With You ....♥
Photo: It's easy to forget things you want to remember.. 
It's hard to forget things you don't want to remember..
 
Relation Is When Someone Hurts You, You Don't Hurt Them Back
When Someone Shouts At You,
You Don't Shout Back
But
When Someone Needs You,
You Always Come Back .


Photo: Golden Rule:-
‘To be happy with a man,
love him little and understand him a lot.
To be happy with a woman,
love her a LOT and DO NOT TRY to understand her ...♥
 
Photo: “Never close your lips to those whom you have already opened your heart.”
 
Whenever i walk alone, i feel sHE is walking with me and asking me 2 hold her hand...

Whenever i sit 2 study, i feel that sHe is gazing at me and giving a cute smile encouraging me 2 study more...

... Whenever i drive, i feel sHE is sitting behind me and giving me a tight hug...

Whenever my mobile blinks, i feel that sHE is holding her mobile and msging me...

Whenever i gaze at moon, i feel sHE's doing the same and missing me very badly...

Whenever i get up suddenly at 3 am or 5 am, i strongly feel that even sHE has got up at the very same time !

This is an AMAZING FEELING which COMES ONLY WHEN u fall in love....:-)


Photo: DEDICATED to all True LOVERS-

Whenever i walk alone, i feel sHE is walking with me and asking me 2 hold her hand...

Whenever i sit 2 study, i feel that sHe is gazing at me and giving a cute smile encouraging me 2 study more...

Whenever i drive, i feel sHE is sitting behind me and giving me a tight hug...

Whenever my mobile blinks, i feel that sHE is holding her mobile and msging me...

Whenever i gaze at moon, i feel sHE's doing the same and missing me very badly...

Whenever i get up suddenly at 3 am or 5 am, i strongly feel that even sHE has got up at the very same time !

This is an AMAZING FEELING which COMES ONLY WHEN u fall in love....:-)

Those who have one, CHERISH it !

Those who dont..., i wish they be BLESSED with it soon!!!
 


I just can’t find the way
To express my love for you,
You are just amazing
In everything you do,
The time I spend with you
Is the best I have ever had,
... And you always know how to help me
When its me who’s feeling sad.
I love you so much
And that I know is true,
Because no matter what I do
I cant keep my eyes off you. ♥
A loving relationship is one in which the loved one is free to be himself,,,

to laugh with me, but never at me ♥

to cry with me, but never because of me ♥

...
to love life, to love himself, to love being loved ♥

Such a relationship is based upon freedom and can never grow in a jealous heart .. !!
तु येणार आहेस...
तु येणार आहेस याची मला चाहुल लागते,
झाडावरली कोकिळा जेव्हा गाणं गाऊ लागते...

तु येणार आहेस याची मला चाहुल लागते,
ठिबक्या ठिबक्या पावसानंतर जेव्हा माती तिचा गंध देऊ लागते...

तु येणार आहेस याची मला चाहुल लागते,
वर्षाराणी पाणी सांडुन जेव्हा जमिनीवरुन वाहु लागते...

तु येणार आहेस याची मला चाहुल लागते,
सुगरिणीचं पिलु जेव्हा खोप्यातुन बाहेर डोकावु लागते...

तु येणार आहेस याची मला चाहुल लागते,
चंद्रासोबत चांदणीही जेव्हा अवकाशात चमकु लागते...

आता तु जाणार आहेस याची मला चाहुल लागते,
भग्नावस्था सारी, कोरडया खट्ट रानी निरव शांतता पानोपानी,
जेव्हा पसरु लागते...

Monday, July 23, 2012

विचारांत विचार अन नंतर हलकंसं हसू ... कि खरंच कशाला गुरफटून घ्यायचं स्वतःला ..
उलगडूदे रहस्य अपोआप आयुष्याचं ..
आपण का त्या घडयाळाच्या काट्याप्रमाणे त्याच्या भोवती फिरायचं ..
वेळेत होतंय न सगळं ..
स्वतःला का मापून ठेवायचं ..!


हसायचं खळखळून .. रडावंही मोकळेपणे .. सांगायचं असतं काही मनातलं .. अलबत .. ''बरंच काही'' ..!!!
पण तरीही स्वतःला का बंदिस्त करायचं ..
खुलेपणाने श्वास घेत मस्त आयुष्याच्या बोटीत स्वतःला झोकून द्यायचं ..


फंडू आहे ना आयुष्य ..
ते फक्त मनमुराद जगायचं ..!! :) :) :)
का नाही बोलत आहेस जेंव्हा इच्छा तर प्रचंडआहे ..
.. मनातलं सगळंच नेहमी नाही उतरत प्रत्यक्षात ..
वाटतं पुष्कळ कोऱ्या पाटीप्रमाणे पुसून टाकावं सारं अन नव्याने सुरुवात करावी .. पुन्हा तुझ्ह्यापासूनच .. !
मनातल्या भावना उचंबळून येतात अन सारं कसं धुडकावून द्यावस वाटत ..
पण एकदा तुझ्या मनाला विचारून पहा .. हेच हवंय का रे नक्की ? :)
अर्थात ... उत्तर नाही हेच !!

उगाच इवल्याशा मनावर प्रश्नांचा भडीमार सुरुकरतोस .. विचारात विचार अन तात्पर्य मात्र काहीच नाही !!

.. नाती अशीही जुळून येणं कठीण .. मग नुकतंच जुळू पाहणाऱ्या कोवळ्या नात्याला का कोमेजू देतो आहेस ?

.. ''काश तेव्हा 'एकदा' बोललो असतो ..'' ही वेळ चुकूनही येऊ नको देऊ ..
पहा खरच एकदा बोलून .. समोरच्याला बोलायची संधी द्यावी लागते रे वेड्या .. :)


तू .. श्वासात दरवळणारा मुद्गंध ..
तू हळूवार प्रेमाचा रंग ..

तू ... दाटून आलेला मेघ ...
तू .. ओल्या पाटीवरची हलकी रेघ।..

तू चिवचिवाट पिल्लांचा ..
तू ..साक्षीदार हळव्या क्षणांचा ..

तू निरागस जसा .. बाळाचे पहिले बोबडे बोल।
तू .. नव्या पालवीवरली सुंदर ओल ..

तू रिमझिमणारा पाऊस जणू ..
तू ..गरजणारी वीज .पण हळू।..

तू निर्मल वाहता झरा ..
तू .. निस्तब्ध किनारा ..


तू होतास शांतशी ज्योत या अस्वथ मनात ..
तूच होतास एकला सोबती या अथांग सागरात ..!!!!


मी हक्काने चिडून भांडशील तू ..
नजरेतली आर्तता न पाहताच समजशील तू ..


जवळ हवा असता न बोलावताच सोबत असशील तू ..
पहात माझ्याकडेच , खूप काहीसं बोलून जाशील ..


नजरेला नजर मिळताच,हळूच पटकन बिलगशील ..
हातात हात घेऊन हसशील ..


आठवणीत तुझ्या अक्षरशः नकोस करून टाकशील , झुरवशील

''क्षण'' .. :)

 

अगम्य असे काही ..
दुर्लभ काहीसे ..

निरागस असे काही ..
अल्लड काहीसे ..!

निःशब्द असे काही ..
अवखळ काहीसे ..!

जपावेत असे काही ..
अन .. .. ''जगावेत'' असेच हे ''क्षण''


आवडावं कोणी..

जपावं कोणी..
हसून लाजावं अन लाजून हसावं कोणी ..
हुमसून रडताना हलकेच हात धरावा कोणी ..
बोला धरताच हक्कानं रागवावं कोणी..

आवडीने ऐकत .. सोबतीत बेधुंद व्हावं कोणी ..
मनाच्या लहरींची साद न बोलताच ऐकावी कोणी ..

 रुसता उगाच प्रेमानं पहावं कोणी..
तू माझी म्हणण्यापेक्षा ''मी तुझा'' म्हणावं कोणी .. :)


अविरत प्रेम काय असतं हे सांगण्यापेक्षा अनुभवावं कोणी

तरीही ते ''अव्यक्त ''च ..!!



म्हणलं तर बरंच सांगेन असं म्हणते तुला ..
नाहीतर आहेच की पुन्हा माझ्यातली मी ..

नाही-हो म्हणता म्हणता सगळं काही बोलून टाकलं ..
तितकंसं नितळ नव्हत म्हणा ..

पण समाधान एवढंच की ते अव्यक्त नाहीये ...
गोष्टीत सांगतात त्याप्रमाणे राजा- राणी वगैरे , पण कधी कोणत्या राजकुमाराने - राजकुमारीला प्रोपोस करण्याच ऐकिवात नाही .. :)

माहिती नाही राहू कसे शकतात ...
यार .. काही झालं तरीही हे पाहिजेच ... :)

किंचित चेहऱ्यावर लाजरं हसू, उगाचंच खेचणं हवंच .. :)

या सगळ्या गोष्टी धम्माल आणतात ,आणि ..
का कोण जाणे आयुष्य अगदी हायसं वाटतं ...

नाहीतर आहेच की पुन्हा ... ''तुझा तू अन माझी मी'' ... !!! :)


पण ...

स्वतःला सावरायला शिकलं पाहिजे ..
भले कितीही अवघड ,कितीही अशक्य ...या भावनांना वेळीच थांबवलं पाहिजे ..

नको होऊन जातं कधीकधी ..
चिडचिड होते .. मान्य ..!!

पण कोणाला पर्वा आहे त्याची ??
..त्रास तुलाच ,काळजी तुलाच .. उबग येतो पुष्कळदा ..

पण .... नक्कीच ,मनाच्या कोणत्यातरी कप्प्यात ती स्वच्छंदी तू हसण्याचा,आनंदी राहण्याचा प्रयत्न करू पाहतीये .. तिला जाऊ नको देऊस ...

लोक काय विचार करतात ..हे सगळं गौण ..
..काय फरक पडतो तुझ्या उदास असण्याचा त्यांच्यावर ..

पण ''त्या'' मनाच्या निरागस कप्प्याला पडतो ..

जग ... स्वच्छंदी .... अगदी ....

हवहवस वाटेल मग आयुष्य

भावलास मजला ''तुझ्यातला तू ..'' !!

जितका अबोल .. तितकाच बोलका ..
बंधनात जितका.. तितकाच स्वच्छंदी ..

चंचल जितका .. तितकाच निशब्द ..
समजूतदार जितका ..तितकाच स्वतःतल लहानपण जपणारा ..
जितका अलिप्त .. तितकाच मनमुराद ,खळखळून हसून दाद देणारा..
असाही अन तसाही ...
...'साधाच तरी माझाच तू' .. :)
चुकामूक व्हावी भावनांची परि

''ओंजळीतला ओलावा ''

मनातला उतरवू पाहतीये ..

एकटेपणामुळे तू स्वतःला समजतेस की हा समजूतदारपणा एकटा बनवतोय तुला ..
''तुझ्यातली तू'' तुला कधी कळलीच नाही ग वेडे..
जपून ठेवलेस ते फक्त क्षण ..!!

क्षणात दडलेल्या आठवणींना मात्र हलकीच मोकळी वाट मिळतीये ..

'ओंजळ' उघडीच आहे ..
'ओलावा' मात्र अजूनही तसाच ..
क्षणही तेच .. आठवणीही त्याच त्या ..
माणस मात्र बदलतात ..
पण .. अजूनही 'त्या' आठवणीतली ऊब कायम आहे ...

...हात नकळत पुढे झाले ..
न जाणो कोणी खुणावतंय का पाहायला ..
त्या ''ओंजळीतला ओलावा'' पुन्हा अनुभवायला .. !! :)
आठवण .. एक सहवास!!'

आठवणीसारखी दुर्लभ गोष्ट नाही ..

जितकी ती हवीहवीशी ,तितकीच नकोसं करून सोडते ..
तेवढीच हळवं करते जितकं सोबत राहून दिलासा देते..
जेवढी हट्टी तेवढंच सांभाळूनही घेते ..

आणि त्यात ती तुझी असली तर बोलणंच नको ..! :)
गालातल्या गालात हसवेल अन किंचित गुलाबी लाजवतेही .. :)
माझाच असावास असंच सांगते जणू ..

खरंच ..
''सहवासाने जपता येतात आठवणी की ...
प्रत्येक आठवण एक सहवास .....??
खरीखुरी वाटते जणू ...तर कधी निव्वळ आभास .....!!!!'' :)


ओळखीचं रुपांतर मैत्रीत होतं
ते म्हणजे प्रेम नव्हे
असतो तो फक्त एक सहवास

मैत्रीनंतर जवळीक होते
ते म्हणजे प्रेम नव्हे
असतो तो फक्त एक सहवास

मनं जवळ येतात
ते म्हणजे प्रेम नव्हे
असतो तो फक्त एक सहवास

एकमेकांशिवाय करमत नाही
ते म्हणजे प्रेम नव्हे
असतो तो फक्त एक सहवास

घडणारी प्रत्येक गोष्ट सांगितली जाते
ते म्हणजे प्रेम नव्हे
असतो तो फक्त एक सहवास

न सांगताच भावना कळू लागतात
तेंव्हाच तर खरं प्रेम होतं
नसतो तो फक्त एक सहवास
बघ तूच तुझ्या डोळ्यांत,
मी काहीच नाही बोलणार,
चोर....चोर आहेत डोळे तुझे.....
सांगितले का नाहीस ते माझं मन चोरणार???

... ... कुणी सांगितलं गं तुला?
... सुंदर दिसायला गालात असावी लागते खळी,
म्हणणाऱ्या त्यांनी अजून पाहिली नाहीयेय हि कळी.

रंग हि नवा अन रुप हि नवे,
साधेपणाचे त्यावर आभाळ हवे,
डोळ्यांतला तुझ्या त्या बोलकेपणा हवा,
जास्त नको....तुझ्या मनात एक छोटासा कोना हवा.

रूप तुझं पाहूनच रोजची पहाट यावी,
पुढचा दिवसच नको...पहाटेनंतर हि पहाटच यावी,
आणि
रोजची तीच पहाट तरी मी रोज नव्यानी पहावी...
मी तुझे विश्व
मी तुझी संगिनी
तुझ्याच अंतरंगी
माझी झळके सावली .
मी तुझे आकाश
मी तुझी धरती
तुझ्याच ह्रदय-क्षितिजावर
माझी प्रित फुलली .
मी तुझे सौख्यमी तुझी प्रेरणा
तुझ्याच मन-सागरी
...
माझ्या विचारांची भरती .
मी तुझे जीवन
मी तुझी प्रभा
तुझ्याच सुखापरी तेवती
माझ्या नयनांच्या ज्योती .