NiKi

NiKi

Monday, July 23, 2012

बघ तूच तुझ्या डोळ्यांत,
मी काहीच नाही बोलणार,
चोर....चोर आहेत डोळे तुझे.....
सांगितले का नाहीस ते माझं मन चोरणार???

... ... कुणी सांगितलं गं तुला?
... सुंदर दिसायला गालात असावी लागते खळी,
म्हणणाऱ्या त्यांनी अजून पाहिली नाहीयेय हि कळी.

रंग हि नवा अन रुप हि नवे,
साधेपणाचे त्यावर आभाळ हवे,
डोळ्यांतला तुझ्या त्या बोलकेपणा हवा,
जास्त नको....तुझ्या मनात एक छोटासा कोना हवा.

रूप तुझं पाहूनच रोजची पहाट यावी,
पुढचा दिवसच नको...पहाटेनंतर हि पहाटच यावी,
आणि
रोजची तीच पहाट तरी मी रोज नव्यानी पहावी...

No comments:

Post a Comment