NiKi

NiKi

Thursday, May 31, 2012






I want to live in your eyes,
die in your arms and be buried in your heart
 if i died or travelled far,
i’d write ur name on every star,so everyone could look up & see,
dat u mean the world 2 me
There are a million stars and a million dreams,
you are the only star for me,
the only dream i dream




 You can fall from a bridge,

you can fall from above,

but the best way of falling,

is falling in love!

Love is like a golden chain that links our hearts together and

if you ever break that chain you'll break my heart 4ever

 How can u tell the rain not 2 fall wen clouds exist?

 How can u tell the leaves not 2 fall wen the wind exists?

 How can u tell me not 2 fall in love wen u exist?


तुला पाहते मी


तुला पाहते मी, मना येतो धीर
तुला भेटण्या जीव, होतो अधिर

तरिही मनाला, भयाचे भुलावे
कसे मी तुला, आपले रे म्हणावे
तुझी माझी तुलना, जसे नीर क्षीर
तरी वेडी आशा, नि वेडाच धीर

तुला पाहते मी, मना येतो धीर
तुला भेटण्या जीव, होतो अधिर

तुझे हासणे, चंद्र फुलतो जसा हा
तुझे चांदणे, जन्म वेडा पिसा हा
तुझे स्वप्न सत्यात, भीनले अचानक
जसे शब्द दोह्यात, विणतो कबीर

तुला पाहते मी, मना येतो धीर
तुला भेटण्या जीव, होतो अधिर
तुझ्यावर जीवच जडला


तुझ्यावर जीवच जडला

औक्षणाचे औचीत्य
साधून तुझ्यावर
माझा जीवच ओवाळीला
काय करू ?
तुझ्यावर जीवच जडला

दृष्ट काढण्याचे अवसान
करून माझ्याच नजरा
मी तुझ्यावरून उतरविल्या
काय करू ?
तुझ्यावर जीवच जडला

प्रीतीच्या देव्हार्यात
देव कसा भेटला
दर्शनाचे निमित्त करून
हृदयात तुला अर्चिला
काय करू ?
तुझ्यावर जीवच जडला

आहेसच तू असा
निर्मल कोमल
प्रेमाळ मधातला
माझ्या सानंदातला

माझाच मला हेवा वाटला
का म्हणून काय विचारतोस
तुझ्यावर जीव नाही का जडला ??


ओठावरील शब्द जेव्हा
मनाच्या भावनाना साद घालतात
तेव्हा जाऊन कुठे
त्यांच्या कविता होतात.

निस्तब्ध डोळे माझे जेव्हा
तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करतात
तेव्हा जाऊन नकळत
या प्रश्नाच्या कविता होतात.

मिटलेले डोळे जेव्हा माझ्या
स्वप्नांना प्रतिसाद देतात
तेव्हा जाऊन स्वप्नांच्या
या कविता तयार होतात.

अस्पष्ट आशेची किरणे जेव्हा
हृदयावर जेव्हा प्रेमभंगाच जाळ विणतात
तेव्हा त्या जाळीदार आशेच्या.
या कविता होतात.


तू स्मित हसल्यावर
दिवस भराचा थकवा दूर होतो
तू स्मित हसल्यावर
मग मी माझा कुठे राहतो
तू शेजारी बसल्यावर

तेव्हां सारं काही स्तब्ध होतं
नकळत श्वासांची लय बिघडते
हालचालींना अचानक स्थिरता येई
पण हृदय वेगात धडधडते

अशा वेळेस तुझी मोरपंखी बोटं
माझ्या केसात रूजू पाहतात
जाणारे सारे क्षण माझे
त्या स्पर्श सुखात भिजू पाहतात

त्या हळव्या क्षणांच्या वलयात
मन किती बधीर होतं
वेळेचं चक्र फिरू नये म्हणून
अतुप्त हळवेपण अधीर होतं

बघता बघता मग
चंद्र नभातून डोकावतो
माझा शेजारचा चंद्र मग
स्वप्नांच्या चांदण्यात हरवून जातो.


असं म्हणतात,
आठवणींना भाषा नसते

त्या हळूच येतात
गत स्मृतींच्या
तरल पडद्या मागून

आणि तुम्हाला
तुमच्या संवेदनांसहित
अलगद......तुमच्या नकळत
उचलून घेऊन जातात

पण माझ्या बाबतीत मात्र
उलटे आहे.
.
आठवणी येऊन,
बसून माझ्या मांडीवर
मला सांगत बसतात
तुझ्या गुज गोष्टी
कोश भावनांचे.............


प्रत्येक जण रमतो आपल्याच कोशात.......

कधी प्रेमाच्या तर कधी सहवासाच्या
कधी आठवणींच्या तर कधी विरहाच्या....

आयुष्य त्यांचे त्यातच गुरफटलेले
त्या कोशाचे बंध त्यातच अडकलेले......

कोशातच त्यांचे आयुष्य हरवलेले
त्यातच त्यांचे अस्तित्व लोपलेले......

विसरले ते या कोशाशिवायहि जग असते
आपले अस्तित्व तेव्हा कुठे आपले भासते...

कोशाचे रंग जरी गोड भासले
तरी खरे आयुष्य हे त्याहूनही सुंदर असते.....

जरा डोकावून पहा तुमच्या कोशातून
आयुष्याचे सगळे रंग पहा जरा अनुभवून....

तोडून बंध सारे त्या कोशाचे
जपा रंग आपल्याही अस्तित्वाचे.

Wednesday, May 30, 2012



माझ्या -हुदयाच्या...प्रत्येक स्पंदनावर...
सखे आता तुझंच नाव असेल...
अन...माझ्या प्रत्येक कवितेत...शोध...
निदान एकदातरी तुझे नाव दिसेल..

पुन्हा त्या सरोवराच्या ...पाण्यात
वारंवार तुझं...प्रतिबिंब दिसेल...
एक बट मुद्दाम सोड सये...गालांवर..
नाहीतर...तो नभीचा चंद्रमा ..लाजेल

सावर...सखी आवर मला..
आज बहुदा -हुदयाचा एखादा ठोका चुकेल...
बघ..शोधशील कदाचित खुळ्यासारखी मला...
जेंव्हा..माझ्या कवितांचा अर्थ वेडे तुला कळेल
खरं प्रेम म्हणजे
परिस्थितीला धैर्याने तोंड देणे.
दोघांचा एकमेकांवर विश्वास असणे.
दोघांची एकमेकांवर निष्ठा असणे.
दु:खात एकमेकांच्या सोबत असणे.
सुखात एकमेकांना आनंद देणे.
तडजोड करण्याची तयारी असणं.
एकमेकांच्या गुणांना जपणे.
दुखावलेली मने परत जोडणे.
भांडण करुन परत जवळ येणे.
एकही शब्द न उच्चारता भावना पोहोचणं.
डोळ्यात फक्त आनंदाश्रु असणं.
एकमेकानां सांभाळणे.
चुकत चुकत शहाणे होणे.
शेवटच्या श्वासापर्यंत सोबत असणे.
प्रेमबरोबर प्रमाणिक असणे.
खरं प्रेम म्हणजे … तू अणि मी, कायम जवळ असणे..!!


तुला चोरून बघताना ♥
मला खुप बर वाटत
तुझ्या मागुन फिरताना
तुझ्या सोबत फिरावस वाटत ♥

तुझे ते निरागस हास्य
निहारून पहावस वाटत
हातात हात घालुन
तुझ्या सोबत चालावस वाटत

तुझ्या त्या लाजण्याकडे
एकटक पहावस वाटत
तुझ्या समोर उभा राहुन
तुझा चेहरा मनात भरावसा वाटत

मला खुप खुप खुप
तुझ्यासोबत बोलावस वाटत
तुझ्यावर जिवापार
प्रेम करावस वाटत

खरचं
तुझ्यावर जिवापार
प्रेम करावस वाटत ♥


जे तुला हि न कळले,
जे मला हि न कळले,
ते आपल्या नयनांना कळले.
अबोल प्रेम हे आपले,...
आज सार्या जगाला कळले,
... फुलणाऱ्या आपल्या प्रेमाला,
आज सार्या जगाने पाहिले,
अन कळत नकळतच,
आपल्या या मैत्रीच्या नात्याला,
प्रेमाचे नाव जुळले,
प्रेमाचे नाव जुळले..!!


तू हसू लागलीस कि अस वाटत,
एखाद गुलाबच फुल फुलाव,
पाहून तुला हसताना,
मी हि खूप खूप हसाव...

तू बरोबर असलीस कि अस वाटत,
दिवस संपूच नये कधी,
अन आपण बरोबरच रहाव,
फक्त तू अन मी,
आजून कोणीच नसाव...
आजून कोणीच नसाव.

"स्तब्ध झाले शब्द माझे...!"





स्तब्ध झाले शब्द माझे, स्तब्ध झाल्या भावना...

या स्थळी, या भूतळी गवसू कुठे तुला मी सांग ना...?

ढिम्म तन अन निंब मन हे, सुन्न झाल्या यातना...

शुष्कं झाली आसवेही शुष्कं झाल्या वेदना...

स्तब्ध झाले शब्द माझे, स्तब्ध झाल्या भावना...॥२॥

खिजवतो निष्टूर वारा, म्हणे अस्तित्व तिचे तू दावं ना...

ती कधी..., ती कुठे..., ती कशी... तुझ ठाव ना...

रात झाली, चांद आला, तारयांचीही वरती रांग ना...

आतुर होऊन शोधिले मी, तुझा तेथेही काही थांग ना...

स्तब्ध झाले शब्द माझे, स्तब्ध झाल्या भावना...॥२॥

मैफिल बसली, तान छेडिली पण गीत काही येईना...

दुभंगलेले मन हे माझे सुरास साथ देईना...

जोडूनी ओंजळ आता करितो पाषाणास त्या वंदना...

पाहुनीही हाल माझे ते दारही होई आप बंद ना.


आयुष्यात तुझ्यावर इतके प्रेम करायचे आहे कि
प्रेमाला वाटावे माझ्यात काही तरी कमी आहे
आणि तुझ्यात इतके स्वताला सामावायचेआहे कि
आयुष्याला हि वाटावे कि आयुष्य किती कमी आहे


वाटते ना असावे कुणीतरी
बावळटासारखे वागणारे
वेड्यासारखा वागेल पण
तेवढेच वेड्यासारखे प्रेम करणारे
वाटते ना असावे कुणीतरी
कितीही कामात असले तरी
एक क्षण आठवण काढणारे
जीव देणारे असतील
पण आपला जीव जपणारे
वाटते ना असावे कुणीतरी..♥♥♥
माझ्या कल्पनांचा निशीगंध
तुझ्या आठवणींशिवाय बहरत नाही
नाही ग सखे निदान ह्या जन्माततरी
तुला विसरणे काही शक्य नाही

तुझे ते श्वास धुंद करुन जाणारे
तुझे ते स्वप्नील डोळे स्वतःमध्ये गुंतवणारे
तुझे ते ओठ मनातलं गुपीत राखणारे
अनं तुझे ते केस श्रावणातील मेघाप्रमाणे भासणारे
सारं काही सारं काही

कधी विसरु शकेन
मला काही वाटत नाही
नाही हे काही शक्यच नाही
कारण...........

माझ्या प्रत्येक श्वासावर
आता तुझेच नाव लिहिले आहे
आणी माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण
आज फक्त तुझाच आहे

माझ्या भावना माझे शब्द
माझे सुःख माझे दुखः
सारं काही तुच आहेस
माझ्या प्रत्येक कवीतांतील
प्राणच सखे तुच आहेस

कारण तुच माझे प्रेम आहेस
तुच माझे सर्वस्व आहेस
♥ "घड्याळा मध्ये तीन काटे असतात,
ते तीनही काटे एकमेकांना एका तासा मध्ये फक्त
एकदाच भेटतात आणि ते सुद्धा फक्त
एका सेकंदा साठीच,
पण तरी सुद्धा ह्या एका सेकंदाच्या गोड
भेटी साठी हे काटे एकमेकांना धरून राहिले आहेत,
नाहीका ? .......................
आपले प्रेम व आपली मैत्री अशीच आहे,
आपण एकमेकांना कधीतरीच भेटतो
, पण तरीही मनाने आपण एकमेकांना धरून
राहिलो आहोत" ..........
♥ त्या गोड भेटीसाठी आणि त्या गोड
आठवणीसाठी ♥


एक रात्र मनातली
स्वप्नं दवांत भिजलेली
चांदण्या मुठीत घेउन
आकाश पांघरून निजलेली

एक रात्र अशीच
आकाश पांघरून निजलेली
गात्र-न-गात्र चेतवून
तुझ्या मिठीत विझलेली . .

A CUTE POEM FOR A CUTE GIRL

You changed my world with a blink of an eye
That is something that I can not deny
You put my soul from worst to best
That is why I treasure you my dearest Marites
You just don't know what you have done for me
You even pushed me to the best that I can be
You really are an angel sent from above
To take care of me and shower with love
When I'm with you I will not cry even a single a tear
And your touch have chased away all of my fear
You have given me a life that I could live worthwhile
It is even better everytime you smile
It so magical those things you've made
To bring back my faith that almost fade
Now my life is a dream come true
It all began when I was loved by you
Now I have found what I am looking for
It's you and your love and nothing more
Co'z you have given me this feeling of contentment
In my life something I've never felt
I wish I could talk 'til the end of day
But now I'm running out of things to say
So I'll end by the line you already know
"I LOVE YOU" more than what I could show

Tuesday, May 29, 2012



आपल्या आवडत्या व्यक्तीला वेळ देऊ शकला नाहीत तर,
दुरावा वाढतो,अंतर वाढते.
यात चूक त्याची पण नसते आणि तिची पण नसते.
चूक वेळेची असते.
यावर एकाच उपाय आहे.
त्या व्यक्तीला जितके क्षण द्याल ते असे द्या कि,
तुमच्या सोबतचे ते दोनच क्षण त्या व्यक्तीच्या एकांतातल्या शंभर क्षणावर भारी पडतील.
जीवाला जीव देणारी माणसं खूप कमी असतात,त्यांना असे गमवू नका.
आयुष्याची मजा एकटे जगण्यात नसते."
स्वप्नातल्या तुला, रोज मी सत्यात पाहतो...

जगाला विसरून,मी फक्त तुझ्यातच हरवतो...

कळतच नाही कधी, मग हा दिस सरतो...

अन स्वप्नातल्या तुला परत सत्यात पाहण्यासाठी...

जीव हा माझा, खरच खूप तळमळतो ...

खरच खूप तळमळतो

.. तिने विचारलं.......का??? काय? काय आवडलं

तुला प्रेम करण्यासारखं

तेव्हा तो तिला सांगतो कि तो का करतो प्रेम
तिच्यावर एक असेल तर सांगू न

मला जेवायला जरा तरी उशीर
झाला कि जेव्हा ओरडतेस

ना त्या काळजी वर प्रेम करतो मी
मुलींबद्दल जरा मस्करीने काही बोलल्यावर तुला येणाऱ्या रागावर प्रेम करतो मी

रस्त्यावर आघावपणा करणाऱ्या टपोरीला एक वाजवून ठेवण्याच्या त्या धाडसिपानावर प्रेम करतो मी

उलट, कोणी काही बोलल्यावर
डोळ्यांत टचकन पाणी आणणाऱ्या त्या निरागसतेवर प्रेम करतो मी

मूड चांगला असेल तर माझी जी खेचाखेची करतेस त्या आघावपणावर प्रेम करतो मी

लहर आल्यावर माझ्याशी कधी कधी FLIRT करतेस न त्या चावटपणावर प्रेम करतो मी

साडीवरचे फोटो दाखवणाऱ्या त्या दिलखुलास त्या मुलीवर प्रेम करतो मी

काही निर्णय घेण्याआधी विषयाची जी चिरफाड करतेस न त्या विचारीपणावर प्रेम करतो मी

दुस-या मुलींचं नाव घेऊन चिडवतेस
ना त्या खोडकरपणावर प्रेम करतो मी

कळत न कळत माझ्या जवळीकीवर
घाबरणाऱ्या त्या घाबरट अल्लड मुलीवर
प्रेम करतो मी

मनातले दु:ख न सांगता डोळे माझ्यासमोर ओले करतेस त्या माझ्यावरच्या तुझ्या विश्वासावर प्रेम करतो मी

सुख दु:खात न चुकता काजळ लावणाऱ्या त्या निरागस टपोऱ्या डोळ्यांवर प्रेम करतो मी

मला दम देणाऱ्या वेड्या मुलीवर प्रेम
करतो मी

दुसऱ्याला समजून घेणाऱ्या शहाण्या मुलीवर प्रेम करतो मी

कधी आघव कधी गोड, कधी रागट
कधी खट्याळ अशा मिश्र स्वभावावर
तुझ्या प्रेम करतो मी

स्वतः: च्या स्तुत्ती वर चमकणाऱ्या आणि लाल बुंद झालेल्या गालांवर प्रेम करतो मी
डोळे वर

ना करता बोलणाऱ्या त्या लाजाळू
मुलीवर प्रेम करतो मी

१-२ रुपयासाठी बाजारात
भांडणाऱ्या त्या मुलीवर प्रेम करतो मी

अशी हि माझी मैत्रीण आयुष्यभर सोबत
राहावी म्हणून

जीवनसाथी करावी तुला इच्छा ठेवतो मी
तू जरी नाही म्हणालीस तरी हे

तुझ्यावरच आयुष्भर प्रेम करीन मी

आणि हो लाजून हो देऊन माझ्या मिठीत लपशील न त्या वेड्या मुलीवर प्रेम करतो मी

किंवा जर नाही म्हणालीस तर

मला वाईट वाटेन म्हणून कासावीस

होणाऱ्या या मुलीवर प्रेम करतो मी ..
सखे, तुझ्या ओल्या केसात सुरांचा उन्माद असु दे तुझ्या केसातुन बरसावं...
माझ्या शब्दांचं वादळ त्याला कवितांचा नाद असु दे तुझ्या रातराणी मेहेफ़िलिनं...
छेडावी जीवघेणी गझंल, माझ्या उध्वस्त जीवाची ......................
त्याला उन्मुक्त दाद असु दे तो मोहाचा घोट प्यायला.... 
मी कधी पासुन आतुर, तुझ्या अनावर पाशाची ........................
त्याला मनसोक्त साद असु दे सखे, तुझ्या ओल्या श्वासात माझा.... .........................
गुलमोहरी श्वास असु दे तुझ्या देहावर फ़ुलावा..... 
माझ्या स्पर्शाचा सडा, तुझ्या मस्तवाल कळ्यांना ..........................
माझ्या मिठीचा वास असु दे तुझी कातरवेळ असावी..... 
माझ्या रात्रीला बिलगायला व्याकुळ, तुझ्या संधी प्रकाशाला सुद्धा ........................
माझ्या विरहाचा भास असु दे तुझ्या पारीजातकानं झुरावं........
 माझ्या उन्मत्त बहाव्यासाठी, 
तुझ्या वसंतातल्या श्रुंगाराला ........


आठवण येते जेव्हा तुझी...
नयन भरुनी येते,
स्वप्न विणलेले सोबतीचे
सारेच विसरुणी जाती...

आठवण येते जेव्ह तुझी...
मन वेडेपीसे होतं,
दुःखाबरोबर सुखाचे क्षण ही
आठवणीत येऊन दुःखच देतं...

आठवण येते जेव्हा तुझी...
मन मनात राहत नाही,
कितीही प्रयत्न केले तरिही
काहूर शांतच राहत नाही..

आठवण येते जेव्हा तुझी...
मन मलाच सांगुन पाही,
तुझ्याविणा जगणे माझे
जगणेच नाही...

आठवण येते जेव्हा तुझी...
मन ओंसडून वाही,
तुझ्या आठवणीँचा झरा
मनात वाहतच राही....
मनात वाहतच राही.....


ओठांनी - ओठांशी बोलून तर बघ ,...

अमृत नाही पाझरले तर सांग मला ....

श्वासांनी - श्वासांना झेलून तर बघ ,...

कस्तुरी नही उधळली तर सांग मला ....

डोळ्यांनी - डोळ्यांशी बोलून तर बघ ,...

प्रेमात नाही पडलीस तर सांग मला ....

मनानेच - मनाला स्पर्श करुन बघ ,...

माझ्यात नाही सामावलीस तर सांग मला ....

ओठांनी - ओठांशी बोलून तर बघ .... !!!


काय असते आठवण?
मनात रुजलेली,
रंगात भिजलेली इंद्रधनुसारखी
सातही रंग उधळणारी,
कधी एकटेपणा वाटला तर,
... गोड स्मृती जागवणारी,
आणि कधी डोळे भरून आले तर, अश्रू म्हणून वाहणारी.
खरंच काय असते आठवण?
वर्तमानात राहूनसुद्धा भुतकाळात नेणारी,
कोणी दूर असले तरी जवळ असल्याचा भास देणारी,
खरंच काय असते आठवण?
मनातील गोड आणि कटू स्मृतीँचा आस्वाद
तर कधी अचानकपणे पडणारा भास
हीच असते आठवण, खरंच
हीच असते आठवण..!!
♥ ♥ ♥ ♥


नाक उडवून, गाल फुगवून
लटकं राग धरून, जेव्हा माझ्यावर रुसुन
बसतेस..
खरं सांगु तेंव्हा तु खुप गोड दिसतेस......

कधी कधी मला कोड्यात टाकतेस..
काहीच सुचत नाही, काय करावं कळत नाही
कधी तर इमोशनल
अत्याचारच करतेस..
खरं सांगु तेव्हा तू खुप गोड दिसतेस..........

काही कधी बोलतच नाहीस,
विनवण्या करुनही हसत नाहीस
स्वतः अबोल राहुन, मला मात्र बोलकं करतेस.....
खरं सांगु तेंव्हा तु खुप गोड दिसतेस..........

कधी कधी " जा !!!,मी तुझ्याशी बोलणारच नाही"
अशी गोड धमकी जेंव्हा मला देतेस.....
खरं सांगु तेँव्हा तु खुप गोड दिसतेस..........

नाही रागावलो कधी, नाही ओरडलो तुझ्यावर कधी
,नाही वागलो मनाविरुध्द तरी
" तुझं मुळी माझ्यावर प्रेमच नाही" असं
तुझ्या मैत्रीनींत खोटं खोटं सांगत फिरतेस...
खरं सांगु तेंव्हा तु खुप छान दिसतेस..........

जीव ओवाळुन टाकतो
तुझ्यावर्, फिदा होतो तुझ्या एका अदेवर
दिवसभर भांडुन ,जेव्हा संध्याकाळी कुशीत
शिरुन खुदकन हसतेस.....
खरं सांगु तेंव्हा तु खुप छान दिसतेस....


भाव आहे नयनी ह्या अन्तरीची साद दे...

जुळली मने आपुली प्रेमाला प्रतिसाद दे...

गुम्फल्या ह्या शब्दमाला गीत तुझे गाण्यासाठी...

आगळ्या या कवितेला सप्तसूरान्चा साज दे...

जुळली मने आपुली प्रेमाला प्रतिसाद दे...

विरही मन हे आतुर झाले तुझ्या दर्शनासाठी...

तप्त ह्रुदयास ह्या चान्दण्याची बरसात दे...

जुळली मने आपुली प्रेमाला प्रतिसाद दे...

आयुश्याचे मार्ग सारे चालले मी तुझ्याचसाठी...

दोन शरीरे एकच आत्मा साहचर्याचे वचन दे...

जुळली मने आपुली प्रेमाला प्रतिसाद दे..

Monday, May 28, 2012



मनी रुंजी घालत विचार तुझे…
ह्रुदयी अनामक काहूर उठे,
डोळे मिटता मी मज पुसे…
तुच समोर की स्वप्न भासे!

अधरांवर टेकता अधरं तुझे…
मी ही हरले, मी ही विरले,
जाणता अजाणता…
तुझ्यासवे विसावले,
दचकून उठता ध्यानी आले…
स्वप्नसृष्टीत होते रमले!

मनी रुंजी घालत विचार तुझे…
ओठांवर अलगद स्मित फुले,
गालांवर फिरती मोर पिसे,
वेडावून मजला मनं हसे!


मन माझे स्वप्नाळू ,
कसे किती आवरावे...

कधी वाटते फुलपाखरू व्हावे
फुलांच्या सुगंधात न्हावून
एकेक पाकळीला विलग करत जावे
त्यांच्या मधुरसाला प्राशून,
हृदयीचे रंग त्यांच्या,पंखावर पेरावे
मन माझे ...

कधी वाटते पक्षी व्हावे
वृक्षवेलींवर रमतगमत
प्रत्येक कडूगोड फळाला चाखत जावे
पंखांमध्ये बळ भरून ,
उंच उंच जात, आकाश त्यावर पेलावे
मन माझे ...

कधी वाटते सरिता असावे
खळखळ पाणी उरी घेत
वळणावळणावर नाचत गात हुंदडावे
मलीन काठांना स्वच्छ धुवून,
हरेक जीवाला तृप्त करत, पुढेपुढे चालावे
मन माझे ...

पुन्हा फिरून वाटते माणूसच असावे
सुखदुःखाच्या हिंदोळ्यावर
मातीला स्पर्शून पुन्हा आभाळ कवेत घ्यावे
रडणाऱ्याचे अश्रू पुसून,
हसणाऱ्याला हसवत, सुरेल जीवनगीत गात जगावे
मन माझे ...


का ग तु अशी वागतेस?
तुला पाहिलं कि हृदयाची घंटा वाजते.
तुझि उपस्थिति अख्ख्या जगाचं सुख देउन जाते.
तुझ्या बरोबर जगलेले दिवस,
आयुष्याला खुप आठ्वणी देउन जातात.
मग अलगद विचारावसं वाटत ,
का ग तु अशी वागतेस ..
तुला पाहिलं कि स्वतःला विसरतो,
तुला पाहिलं कि स्वतःला हरवतो,
तुला पाहिलं कि जगच ठेंगन वाटत.
तु प्रत्येक गोष्ट किति सहजतेने समजुन घेतेस ग.
मग अलगद विचारावसं वाटत ,
का ग तु अशी वागतेस ग.
तुला खुप जाणावस वाटत,
तुला खुप ऒळ्खावस वाटत,
सारख तुझ्या सानिध्यात रहावस वाटत.
सर्वात मिसळून जाण्याचि तुझि ति अदा.........
मग अलगद विचारावसं वाटत ,
का ग तु अशी वागतेस ग.
तुझा तो अबोलेपणा, निरागसते चा प्रितिपणा,
मला तुझ वेड लाउन जात.... वेड....
आनंद व्यक्त करणारि तुझी अदा,
जगण्याला महत्व देउन जाते.
मग अलगद विचारावसं वाटत ,
का ग तु अशी वागतेस ग.
तुझ हसणं, तुझ रुसण,
माझ्या आयुष्याला जणू ऊद्देश देउन जातं.
आयुष्यात जणू तुझीच गरज होती,
अस्सं वाटायला लागतं तुझा विचार जरी मनात आला ना........
तरी गालावर एक गोड्सं हसु देउन जातं.
मग पुन्हा पुन्हा विचारवसं वाटत ग....
का ग तु अशी वागतेस गं....
का ग तु अशी वागतेस गं...
आहे एक वेडा मुलगा
तिच्यावर खुप प्रेम करतो
आठवण तिची आल्यावर
कविता करत बसतो..
कधी तिच्या केसांत गुंततो
कधी तिच्या डोळ्यात बुडतो
 कधी तिच्या ओठांवर अडकतो
 तर कधी गालवर
गोड हसू आणातो

नेहमी काहीना काही उपमा देतो
आज मनी तर उद्या रानी..........!
प्रेम फक्त तोच करतो असे काही वागतो

पेनाची शाई संपली तरी शब्द काही संपे ना
त्याच्या कविता तिला हट्टाने दाखवायचा
कवितेतील तीच तू अशी जाणीव मात्र दयाचा
कवीता तिला आवडली की वही मागे चेहरा लपवून
खुप गोड हसायची............ !



ती दिसली.....
भिजलेल्या डोळ्यातून आज,
शब्द मनात उतरले
तिला पाहताच क्षणी,
डोळ्यातून अश्रु बरसले.....
तिचीच आस धरून,
आयुष्यात मी बिखरलो
नसताना ती जवळ,
जगनेही मी विसरलो.....
तिचीच वाट पाहत,
पापण्या माझ्या पाणवल्या
सावल्या डोळ्यातून ह्या,
आभाळा सारख्या बरसल्या.....
खुप काही म्हणायच होता,
शब्द माझे आतुरलेले
मुखातून न उमलता,
डोळ्यातून उमललेले.....
म्हंटल ज़रा जवळ जाऊन,
 तिच्याशी थोड बोलाव
तिच्या आठवणीसंगे जगतो,
तिलाही थोड कळाव.....
तिच्या आठवणीची ओंजंळ,
तशीच भरून ठेवलेली
एकही क्षण न सांडवता,
 जिवापाड मी जपलेली.....
कंठ आज दाटून आला,
तिला समोर पाहून
बरच काही बोलायच होत,
 मनात गेले शब्द राहून.....
इतक्यात तिने पाहिले मला,
 डोळ्यात अश्रु ढाळत
अनेक प्रश्नांची उत्तर मिळाली,


रांगेत उडती पक्षी
रेखित सुंदर नक्षी
रम्य त्या सांजवेळी
भिजलेल्या कातरवेळी

भिनला गंध मातीचा
घेतसे ठाव मनाचा
रम्य त्या सांजवेळी
भिजलेल्या कातरवेळी

वाटते आभाळी उडावे
रंगात केशरी न्हावे
रम्य त्या सांजवेळी
भिजलेल्या कातरवेळी

क्षितिजावर रंगांची होळी
कोण प्रेमयुगुल रंग उधळी
रम्य त्या सांजवेळी
भिजलेल्या कातरवेळी

पाणी नदीचे भासते शांत
जणू भास्करा त्या सामावित
रम्य त्या सांजवेळी
भिजलेल्या कातरवेळी

असावी प्रियाची साथ
आणि सुखाची बरसात
रम्य त्या सांजवेळी
भिजलेल्या कातरवेळी

माझ्या स्वप्नात माझ्या मनात



माझ्या स्वप्नात माझ्या मनात
माझ्या जीवनात फक्त तू


तुझ्याशिवाय अपूर्ण मी
तुजसवे परिपूर्ण मी
आकाशीच्या चंद्रासारखा
का असा दूर तू

माझ्या स्वप्नात माझ्या मनात
माझ्या जीवनात फक्त तू


तुझ्याशिवाय सुखही नकोसे
तुजसवे दु:खही हासे
जवळ असतोस मृगजळासारखा
का असा दूर तू


माझ्या स्वप्नात माझ्या मनात
माझ्या जीवनात फक्त तू


तुझ्याशिवाय शब्दही अपुरे
तुजसवे मन कवितेने भरे
भासतोस एका आनंदी गीतासारखा
का असा दूर तू


माझ्या स्वप्नात माझ्या मनात
माझ्या जीवनात फक्त तू


तुझ्याशिवाय गुलाबही गंधहीन
तुजसवे हरेक फुल जाते सुगंधून
फुलतोस का मी झोपल्यावर रातरानिसारखा
का असा दूर तू


माझ्या स्वप्नात माझ्या मनात
माझ्या जीवनात फक्त तू


तुझ्याशिवाय जगते मी अर्थहीन
तुजसवे सुखावते माझे जीवन
वागतोस मनमौजी वाऱ्यासारखा
का असा दूर तू


माझ्या स्वप्नात माझ्या मनात
माझ्या जीवनात फक्त तू


येशील न होवून चंद्र पौर्णिमेचा
बरसशील न होवून पाऊस वळीवाचा
फूलशील न होवून कमळ कायमचा
राहशील न होवून प्रियकर जीवनभराचा
कारण


माझ्या स्वप्नात माझ्या मनात
माझ्या जीवनात फक्त तू

मी तुझ्या मनी वसते



रुसू नकोस माझ्यावर
दूर तुझ्यापासून असते
कारण तू माझ्या मनी
अन् मी तुझ्या मनी वसते


अबोल माझी प्रीती तुझ्यावर
मनात तुझ्याशीच बोलत असते
मनाला छळणारे प्रश्न
मनातल्या मनात तुलाच पुसते


प्रेम करतोस हसऱ्या मम चेहऱ्यावर
हसताना अवघडलेली असते
संवाद असतो मनात
तुझ्याच विनोदावर मी हसते


मनातल्या आपल्या प्रेमावर
तुझेच प्रेमगीत गात असते
तू मी आणि आपले प्रेम
स्वप्नातील त्या गावी दिसते


मिळेल सर्वकाही श्रद्धा देवावर
प्रेमाची ताकत मोठी असते
का आभाळ भरून आले कि
मन माझे मयूर बनून नाचते?

तुझ्या माझ्यात


तुझ्या माझ्यात
प्रेमाचा स्पर्श
मनाचा हर्ष


तुझ्या माझ्यात
एकमेकांचे भास
मिलनाची आस


तुझ्या माझ्यात
स्वप्नांचे दिवे
रोजच नवे


तुझ्या माझ्यात
अबोली फुलली
लाली मम गाली


तुझ्या माझ्यात
नजरेचे धुंद खेळ
व्यापून सर्व वेळ


तुझ्या माझ्यात
हास्याचे ओघळणे
नदीचे खळखळणे


तुझ्या माझ्यात
हळुवार वेदना
गोड संवेदना


तुझ्या माझ्यात
क्षणाचा दुरावा
जन्मात न यावा


तुझ्या माझ्यात
किती या भावना
आभाळात मावेना


तुझ्या माझ्यात
रोज बहरणारे प्रेम
नित्याचाच नेम!
स्वप्नात हरवलेले एक मन
वास्तवाचे नव्हते जराही भान
एका प्रेमळ शब्दाने भारले तिला
नव्हती कमतरता मग सुखाला
त्याचे असणे
प्रेमाची हिरवळ
सुगंधाचा दरवळ
भावनांची दाटी
फक्त त्याच्यासाठी
त्याचे नसणे
जीवाची होरपळ
भेटीसाठी तळमळ
उठता विरहाचे रान
उडून जाती तिचे प्राण
स्वप्नातून मन जागं झालय
त्याने वास्तवाचं भान दिलय
सुखाने त्याचं घर भरलंय त्याच्या सहवासात मन रमलय!

Friday, May 25, 2012



नयनांचा हा रम्य पिसारा झुलता वाटे
मोहाचा खेळ सारा करामत होई कधी
 जुळती हृदयाच्या तारा तर कधी शोधसे
 क्षणभराचा निवारा रंग हे नवखे
मना भुरळ घाली जणू इंद्रजाल
हे क्षणात उमले नि क्षणात नाहीसे
होई दुनियेत या पाऊल ठेवता मन
जणू वाऱ्यावर पाचोळा पाचोळा
राधेसमवेत रमलेला तो मुग्ध रघुनंदन सावळा

Just A Note To Remind You That...I LOVE YOU






















































Wednesday, May 23, 2012


राधा रानी प्यारी


राधा रानी प्यारी वृषभानु की दुलारी हैं
लगे बड़ी ही प्यारी सरकार हमारी हैं
ठाकुर की ठाकुरायण मोहन मोहिनी प्यारी हैं
कृष्णा से मिलावन वाली राधा जी सरकार हमारी हैं
राधा में कृष्णा समाये कृष्णा में राधा प्यारी हैं
भोली महारानी रसराज की प्रिया प्यारी हैं
यही राधा प्यारी रसराज से मिलावन वाली हैं
हे राधा प्यारी रसराज से मिला दो
रसराज के संग अपने प्यारे दरस करा दो
उस मुरली मनोहर चितचोर से
दो बातें हमारी भी करवा दो
हमे भी राधा प्यारी
अपने चरणों की दासी बना लो
हमे रसराज संग अपने दरस करा दो


मस्तीत चालणार
धुंदीत बोलणार
गंधित करणार असावी ... !

गद्यात भेटणार
पद्याने बाटणार
फितूर वाटणार नसावी ... !


काव्याचे अंग
अन रसराज संग
मैफलीत गाजणार असावी ... !

शब्दांच्या ओझ्यात
यमकांच्या बोझ्यात
अर्थाला बुजणार नसावी ... !


छंदाशी खेळणार
गंधाशी भाळणार
मुक्तीत लोळणार असावी ...!

ओळीला ओळ
अन कळेना घोळ
अंत ती पाहणार नसावी ... !


वाचताना छोटी
अन अर्थाला मोठी
सुखद 'अट्याक' असावी ... !

अवघड - बोजड
ज्ञानियाना डोईजड
डोक्याला 'हेड्याक' नसावी ... !


लयीत हसणार
व्रतात बसणार
मनात ठसणार असावी ... !

अलंकाराचे नसणे
वर - वर दिसणे
तालात चुकणार नसावी ..


डंखता ते ओठ ओठी
मी गुलाबी न्हाहतो
पाहतो मग, पाहतो जे
ते गुलाबी पाहतो

तू अशी अन मोगरा हा
आग गंधित लावतो
धावतो मग देह माझा
रिक्त होण्या धावतो

धुंदते लावण्य जेंव्हा
स्वर्ग देही पाहतो
दाहतो मग ओठ होउन
देह माझा दाहतो

तो शहारा तृप्त अन
अतृप्त मी का वागतो?
मागतो मग मी पहाटे
तो शहारा मागतो

धुंदीचा हा दंश ताजा
नित्य हृदयी वाहतो
राहतो तूझ्यात काही
अंश माझा राहतो


चढलेली धुंदी
गाठलेला ज्वर
वेडावलो पार
स्पर्शानेच

वेगळीच नशा
प्रिये तुझी आहे
कोण मग पाहे
मदिरेला

अडखळे पाय
दूर तुझ्या जाता
सोडवेना आता
बाहुपाश

लागलेच आता
तुझे ते व्यसन
म्हणतील जन
वाया गेला

म्हणताती म्हणो
त्यांना काय ठावे
झिंगताती नवे
ब्र्यांड रोज


ही ओढ कसली लागलीये मला
हे मला न उमजे
सांग सखे या ओढीलाच सगळे
प्रेम का समजे

तुझा सहवासाच्या क्षणात रमावेसे वाटते
हॄदयात मझ्या तुझीच साठवण
मझ्या मनाची गुंतागुंत वाढवत राहते
व्याकुळ करते तुझीच आठवण

बस आता नाही सहन होत दुरावा
सखे सोड आता तरी हा अबोला
येवुन विरघळ मझ्या मीठीत
सामवून घेईल माझ्यातच तुजला

उघड्या डोळ्यांसमोर माझ्या
तुझ्याच आठवणींचा पडदा पडतो
जगाचा विसर पडतो मला
असा तुझ्यातच कसा मी गुंततो

कसली ओढ लागलीये मला
तशीच ओढ लगलीये काग तुला
सांग सखे आज तु मला
विरह नाही ना सहन होत तुला

" तुझी ओढ किती गहरी...?"
"शून्यता नजरेत भरली...
का स्तब्धता वेळेत आली...?
न कळे मज आता...हि पहाट असे कि सांज प्रहरी...
तुझी ओढ किती गहरी...?"


"विरहाच्या ह्या तप्त ज्वाला...
उठवती अशांत आठवणींच्या लहरी...
तिज पासून लपण्यास...अपुऱ्या मज अवघ्या दिशा दाही...
तुझी ओढ किती गहरी...?"


"बुडतो त्याच आठवणींच्या डोहात,
काही क्षणात हजार वेळी...
नाही दिसत कुठलाच आधार...तूच आता मज तारी...
तुझी ओढ किती गहरी...?"

Tuesday, May 22, 2012

You are Everything to Me ♥

Because you are my best friend, you taught me more than you will ever know
To believe in myself, to love with my heart, to let my true colors show
Because you are my best friend, I can now face the world so proudly
Knowing that you will always be there, your smile I so love to see

Because you are my love, I have now experienced so much
Like the way you hold me close, the warmth of your loving touch
Because you are my love, my life is so very different now
Nothing can stop our love, together as one we will survive somehow

Because you are my life, no longer will I face my troubles alone
For we are now a couple, with your actions so often you have shown
Because you are my life, my future I now so eagerly anticipate
Though we may be apart right now, for you I would forever wait

Because you are my soul-mate, love is no longer just an emotion
The times we have shared, only a prelude to a lifetime of fun
Because you are my soul-mate, loving you comes so naturally
You are the air that I breathe, you are so very much to me

Because you are everything to me, so proud I am to say
That I love you so deeply, even more with each passing day
Because you are everything to me, this much I want you to always remember
That I loved you yesterday, I love you today, I will love you forever

YOU ARE MY EVERYTHING

I LOVE YOU

 I love you with all my heart, my mind, my body and my soul. You are everything to me, my best friend, my love, my life, my heartbeat, the air I breath, my soul mate, my other half, my better half. I love you more than anything in this world and making you happy is my purpose of life, is my goal. I LOVE YOU with all my heart. Be mine forever..........................



प्रीतीचे गीत मी गाऊ कसा ?

प्रिये तुजवीण राहू कसा ?
प्रीतीचे गीत मी गाऊ कसा ?

येई संध्या तीच दिवाणी
नसे तुझी छटाही राणी
रेतीत पाऊलखुणा तुझ्या कश्या ?
प्रीतीचे गीत मी ..........................

नसती सूर्य, चंद्र, तारे
उदास गाणे गाती वारे
मनातल्या लाटांना थोपवू कसा ?
प्रीतीचे गीत मी .........................

वाहू लागले ,ग , पहाट वारे
गंध न तुझे ,न,तुझे इशारे
स्वप्नात सखे ,असा जगू कसा ?
प्रीतीचे गीत मी .......................


आज तू येणार नाहीस
आज.. आज जसा सूर्य उगवणारच नाही
आज.. आज पक्षांची किलबिल नकोशी वाटणार
आज.. आज फक्त असणार.. वाट पाहणं.. निरर्थक असं
माहित असूनही तुझ्या वाटेकडे डोळे लाऊन बसणं..
आज.. आज तुझी किंमत नव्याने कळणार..
आधीचीच लाखमोलाची तू..
आज.. आज तू अनमोल होणार..
तुझ्या चाहुलींना आज कशाचीच तुलना नसणार..
तुझं न येणं .. आणि माझं झुरणं..
हे दिवसभर चालणार..
हे असं दिवसभर असणार...
ढग दाटून येईल
पुन्हा हवेत गारवा येईल
वाट पाहत उष्णावलेली ती धरत्री ही
हळूच सुगंधून मनात ओढ प्रितीची दाटेल
मग आठवण तूझी येते..!!
अशीच पहील्या पावसा सारखी आलीस
आणि जाताना डोळे ओले करन गेलीस
तो पाऊस तरी उदया पुन्हा येईल
पुन्हा त्याची अन माझी भेट होईल
पण..??
तू मात्र येणार नाहीस
तूझा आठवण येते...!!
तू त्या दवांसारखी होतीस
थोडंसं प्रेम देऊन त्या पानांस बोलके करून गेलीस
तू त्या वारयासारखी आलीस
जाताना आठवणींचे वादळ देउन गेलीस
ते वादळ आता कधीही उठतं
तूला आठवताच भर ऊन्हातही डोळयांत पाणी आनतं..
खूप आठवण येते गं
आठवण तूझी
मनात आठवणींच्या लाटाने खचून गेलो....
आठवण तूझी येते.. !!
(¯`v´¯)
.`·.¸.·´ ?
¸.·´¸.·´¨) ¸.·*¨)(¸.·´ (¸.·´


एक "हसू"......
तू शिकवलेलं,
सहज जपलेल,
कायम सोबत करणार,
खूप आनंदी ठेवणार,


एक छंद,
तुझ्यामुळे लागलेला,
शब्दांना आपलेस करणारा,
मन जोडणारा,
वर्तुळ पूर्ण करणारा,


एक "स्वप्न".....
तू दाखवलेलं,
वेड करून पळवणार,
वर्तमानात जगवणार,
सत्यात उतरू पाहणार,


एक "नाते".....
धाग्यांमध्ये राहणार,
चिरंतन असलेल,
आयुष्यभर जपलेल,
तुझ्यासह आपल्यासाठी................


आज डोळ्यातले अश्रू हि सुकले
मी वाट पाहुनी थकले
येशील कधी रे साजना
हाक हृदयाची एकना

वाटेवर डोळे थक्क झाले
प्रीतीचे नवे खेळ निराळे
विरहाचे पत्र तूही वाचना
हाक हृदयाची एकना

तू श्रापित चंद्र
मी तुझी चादनी
आज भेटूनी बनु नवी रागिणी
मज बघुनी जरा तुही लाजना
हाक हृदयाची एकना


असो चंद्रप्रकाश, कधी अंधार सारा
असो सावली, कधी उन्हाचा पसारा
आहेस हृदयात तू, होऊनी ध्रुवतारा


असो मी एकटा, कधी सोबती दुसरा
असो वाट पाहत, कधी स्वप्न साजरा
आहेस हृदयात तू, होऊनी ध्रुवतारा


असो क्षण सुखाचा, कधी दुख: बोचरा
असो बेचिराख मी, कधी आसमंत सारा
आहेस हृदयात तू, होऊनी ध्रुवतारा



प्रेमात पडल्यावर सगळं जग सुंदर होऊन जातं
वेळीअवेळी आठवण येऊन डोळ्यात पाणी येतं

आवडता चेहरा सारखा नजरेसमोर येतो
स्वप्नातही तोच कसा पुढे उभा र्‍हातो ?

कॅडबी द्यावी का द्यावं छान फूल
काय बरं द्यावं याची सतत पडते भूल

उशीर हा करतो किती, वेळ मुळी पाळत नाही
कसा वेळ काढतो इतका हेच हिला समजत नाही

कधी गप्पा कधी रुसवा वेळ जातो भराभरा
तीन तास गेले की चल मी निघते जरा

सहवासाची ओढ अशी काही केल्या जात नाही
आज बास, उद्या भेटू बोलणं काही संपत नाही

क्षण-दिवस सुखभरे निघून जातात पटकन्
लग्न एकदा झाले की नुसती उरते आठवण....


थेंब गालावरून निथळे खांद्यावरी,
त्या नितळ थेंबात भिजू दे.
केस ओले तुझे, जीव नव्याने रुजे,
आग या मनाची विझू दे.
हा देह आगीचा शांत कर चुम्बुनी,
आणखी नको लाउस आग पाहून लांबुनी.
स्वर्ग सुख तोकडे, तू जवळी असता लाडके,
मांडीवर शांत तुझ्या निजू दे.

माझी वाट दूरची, दूरच्या गावची,
थांबलो मी जरा विश्रांती घ्यायला,
खूप काही इथून न्यायचे मला जरी,
पाहुनी मी तुला लागलो सर्वस्व द्यायला
एक हळुवार श्वास टाक माझ्यावरी,
अलवार पाऊल ठेव माझ्या घरी,
घेऊ मिटुनी सारी कवाडे दाराची,
घेऊ उघडून कवाडे अंतरीची,
देह माझा कधीतरी घे बाहोत लपेटून,
देहास तुझ्या मिठीत सजू दे.

रात्रभर बोलू दोघे निवांत,
जागवू रात्र ती,
दुरावा क्षणाचा नको,
विसरू भान अंगाचेही,
शुद्ध भाव पवित्र मिलन,
होऊ दे साजणी,
हात दे हातामध्ये तू जरा लाजुनी,
अधिकार कसलाही नको कुणावरी,
छाप विश्वासाची मनावरी उमटू दे.

तू जेव्हा लागतेस काही बोलायला,
शब्द हि माझे लागती हरवायला,
पाहता पाहता वेळ जाई निघून,
कळेना काही मला काय लागे व्हायला.
जीभ होते जड, बोलणे अवघड,
स्वतःला मांडण्याची सुरु असते धडपड.
तू काय समाजत असशील मला,
वेडपट कि घमेंडी कुणी,
काय सांगू किती बोलतो तुझ्याशीच,
मी नेहमी माझ्या मनी.
सांगता येईना, तुलाही समजेना कसे,
बोल माझ्या मनीचे मनी तुझ्या उमटू दे.

रम्य कांती तुझी, गौर वर्ण तुझा,
नितळ काया, शुद्ध माया तुझी,
तुला काय ठाऊक असेल,
कि कुणी वेडा जपतो तुझी छाया मनी.
हि भीती वाटते राग येईल तुला,
तुझे स्वच्छ वागणे , माझी चोरटी नजर.
दाखवतो वागणे वेगळे तुला,
पण रात्री कवितेत माझ्या तू असतेस हजर.
नाही भाव माझाही खोटा असेल कधी,
पण प्रेम माझे तुझ्यावरी सांगता येईना...........................


प्रेम कधी सांगून किंवा पाहून होते असे नाही,
ज्या हृदयाशी गाठ बसते, ते आपलेच असते असे नाही,
ती आपली होणारच नाही, ह्या भीतीचे वादळ मनात फिरतच असते,
तिच्या सहवासातून दूर निघून जावे कि नाही तिथेच मन फसते . . .

जेव्हा विचार मनात तिचा येतो, तेव्हा मन बावरून जाते,
येईल का माझ्या मागे ती कधी, हे सतत मन वळून पाहते,
पण मनाला दिलासा देण्यासाठी, फक्त तिची आठवणच असते,
काय होईल प्रेमाचे माझ्या, कारण ओठांत आणि मनात तीच असते . . .

कधी कधी वाटते, तिला मनातले सगळे सांगून टाकावे,
असलेले प्रेम माझे, जणू तिच्या हृदयात ओतून पहावे,
जर होकार मिळाला, तर हृदयाला होणारा त्रास तितकाच असेल,
आणि नकार असेल, तर हृदय माझे तिथेच जळावे . . .

का असे प्रेम होते, ज्याला सगळीकडून बंधनेच असतात,
दमट, कोरड्या हवेमध्ये, ढग जसे दाटतात,
जरी नाही मिळाली मला साथ तिची, पण तिला मात्र माझे प्रेम कळावे,
एक बंधनरुपी मुर्तीम्हणून, तिच्या हृदयात कायमचे मलाच स्थान मिळावे . .


प्रेम कधी सांगून किंवा पाहून होते असे नाही,
ज्या हृदयाशी गाठ बसते, ते आपलेच असते असे नाही,
ती आपली होणारच नाही, ह्या भीतीचे वादळ मनात फिरतच असते,
तिच्या सहवासातून दूर निघून जावे कि नाही तिथेच मन फसते . . .

जेव्हा विचार मनात तिचा येतो, तेव्हा मन बावरून जाते,
येईल का माझ्या मागे ती कधी, हे सतत मन वळून पाहते,
पण मनाला दिलासा देण्यासाठी, फक्त तिची आठवणच असते,
काय होईल प्रेमाचे माझ्या, कारण ओठांत आणि मनात तीच असते . . .

कधी कधी वाटते, तिला मनातले सगळे सांगून टाकावे,
असलेले प्रेम माझे, जणू तिच्या हृदयात ओतून पहावे,
जर होकार मिळाला, तर हृदयाला होणारा त्रास तितकाच असेल,
आणि नकार असेल, तर हृदय माझे तिथेच जळावे . . .

का असे प्रेम होते, ज्याला सगळीकडून बंधनेच असतात,
दमट, कोरड्या हवेमध्ये, ढग जसे दाटतात,
जरी नाही मिळाली मला साथ तिची, पण तिला मात्र माझे प्रेम कळावे,
एक बंधनरुपी मुर्तीम्हणून, तिच्या हृदयात कायमचे मलाच स्थान मिळावे . .


ती किती वेडी आहे,
एवढी शी गोष्ट तिला समजली नाही
मी किती वेडा आहे,
मला एवशी शी गोष्ट सांगता आली नाही
ती किती वेडी आहे,
डोळ्यातल्या भावना तिला काळात नाही
मी किती वेडा आहे,
तिच्या डोळ्यातच पाहत नाही
ती किती वेडी आहे,
प्रत्येक गोष्ट निरखून पाहते
मी किती वेडा आहे,
प्रत्येक गोष्टीत तिला पाहतो
ती किती वेडी आहे,
प्रत्येक गोष्टीवर रगवते
मी किती वेडा आहे,
मला तीच रागवन् ही आवडत


Hold Me . . .
Like I m The Last Person
You Want In Your Arms . . .
Kiss Me . . .
Like Its Gonna Be The Last
Kiss You Ever Going To Taste
Hug Me . . .
Like You Want Me Forever
But
Most Of All
Love Me . . .
Like I m The One You Always
Dreamed Of . . .