नाक उडवून, गाल फुगवून
लटकं राग धरून, जेव्हा माझ्यावर रुसुन
बसतेस..
खरं सांगु तेंव्हा तु खुप गोड दिसतेस......
कधी कधी मला कोड्यात टाकतेस..
काहीच सुचत नाही, काय करावं कळत नाही
कधी तर इमोशनल
अत्याचारच करतेस..
खरं सांगु तेव्हा तू खुप गोड दिसतेस..........
काही कधी बोलतच नाहीस,
विनवण्या करुनही हसत नाहीस
स्वतः अबोल राहुन, मला मात्र बोलकं करतेस.....
खरं सांगु तेंव्हा तु खुप गोड दिसतेस..........
कधी कधी " जा !!!,मी तुझ्याशी बोलणारच नाही"
अशी गोड धमकी जेंव्हा मला देतेस.....
खरं सांगु तेँव्हा तु खुप गोड दिसतेस..........
नाही रागावलो कधी, नाही ओरडलो तुझ्यावर कधी
,नाही वागलो मनाविरुध्द तरी
" तुझं मुळी माझ्यावर प्रेमच नाही" असं
तुझ्या मैत्रीनींत खोटं खोटं सांगत फिरतेस...
खरं सांगु तेंव्हा तु खुप छान दिसतेस..........
जीव ओवाळुन टाकतो
तुझ्यावर्, फिदा होतो तुझ्या एका अदेवर
दिवसभर भांडुन ,जेव्हा संध्याकाळी कुशीत
शिरुन खुदकन हसतेस.....
खरं सांगु तेंव्हा तु खुप छान दिसतेस....
No comments:
Post a Comment