NiKi

NiKi

Monday, May 28, 2012



रांगेत उडती पक्षी
रेखित सुंदर नक्षी
रम्य त्या सांजवेळी
भिजलेल्या कातरवेळी

भिनला गंध मातीचा
घेतसे ठाव मनाचा
रम्य त्या सांजवेळी
भिजलेल्या कातरवेळी

वाटते आभाळी उडावे
रंगात केशरी न्हावे
रम्य त्या सांजवेळी
भिजलेल्या कातरवेळी

क्षितिजावर रंगांची होळी
कोण प्रेमयुगुल रंग उधळी
रम्य त्या सांजवेळी
भिजलेल्या कातरवेळी

पाणी नदीचे भासते शांत
जणू भास्करा त्या सामावित
रम्य त्या सांजवेळी
भिजलेल्या कातरवेळी

असावी प्रियाची साथ
आणि सुखाची बरसात
रम्य त्या सांजवेळी
भिजलेल्या कातरवेळी

No comments:

Post a Comment