तुझी आठवण मी घरातून बाहेर निघायला
आणि तुझी आठवण यायला एकच गाठ पडते....
ती नेहमीच धडकते मला
अन घरभर पसरते ............
मी मग हातचे काम टाकून
तिच्या मागे लागतो
घरचे म्हणतात हा का असा
वेड्यासारखे वागतो ?
आता मात्र सवयच झाली आहे,
मला तुझ्या आठवणीची आणि घरच्यांना माझी ......
म्हणून आज मुद्दामच
मी सारं काम आटोपून
दारात उभा आहे तिच्या प्रतीक्षेत
असा निरोप आला आहे की ती तिकडून आहे निघाली
आणि तुझी आठवण यायला एकच गाठ पडते....
ती नेहमीच धडकते मला
अन घरभर पसरते ............
मी मग हातचे काम टाकून
तिच्या मागे लागतो
घरचे म्हणतात हा का असा
वेड्यासारखे वागतो ?
आता मात्र सवयच झाली आहे,
मला तुझ्या आठवणीची आणि घरच्यांना माझी ......
म्हणून आज मुद्दामच
मी सारं काम आटोपून
दारात उभा आहे तिच्या प्रतीक्षेत
असा निरोप आला आहे की ती तिकडून आहे निघाली
No comments:
Post a Comment