तू स्मित हसल्यावर
दिवस भराचा थकवा दूर होतो
तू स्मित हसल्यावर
मग मी माझा कुठे राहतो
तू शेजारी बसल्यावर
तेव्हां सारं काही स्तब्ध होतं
नकळत श्वासांची लय बिघडते
हालचालींना अचानक स्थिरता येई
पण हृदय वेगात धडधडते
अशा वेळेस तुझी मोरपंखी बोटं
माझ्या केसात रूजू पाहतात
जाणारे सारे क्षण माझे
त्या स्पर्श सुखात भिजू पाहतात
त्या हळव्या क्षणांच्या वलयात
मन किती बधीर होतं
वेळेचं चक्र फिरू नये म्हणून
अतुप्त हळवेपण अधीर होतं
बघता बघता मग
चंद्र नभातून डोकावतो
माझा शेजारचा चंद्र मग
स्वप्नांच्या चांदण्यात हरवून जातो.
No comments:
Post a Comment