ओठावरील शब्द जेव्हा
मनाच्या भावनाना साद घालतात
तेव्हा जाऊन कुठे
त्यांच्या कविता होतात.
निस्तब्ध डोळे माझे जेव्हा
तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करतात
तेव्हा जाऊन नकळत
या प्रश्नाच्या कविता होतात.
मिटलेले डोळे जेव्हा माझ्या
स्वप्नांना प्रतिसाद देतात
तेव्हा जाऊन स्वप्नांच्या
या कविता तयार होतात.
अस्पष्ट आशेची किरणे जेव्हा
हृदयावर जेव्हा प्रेमभंगाच जाळ विणतात
तेव्हा त्या जाळीदार आशेच्या.
या कविता होतात.
No comments:
Post a Comment