NiKi

NiKi

Wednesday, May 16, 2012

जेव्हा काहीच सुचत नाही
तेव्हा करत बसतो मी
तुझ्यावर कविता..............

मी नुसतं आठवलं जरी तुला
पानंच्या पानं भरून जातात
मग मला तश्या आपोआपच
आठवणी ही भरभरून येतात

आज पण बसलोय,
पूर्ण तयारीनिशी
शाईचा पेन, दौत आणि
कागदाचे दस्ते घेऊन बाजूला

मी लिहायला कागदावर जरा कुठे निब टेकवतोय तोच
धावत धावत धाप टाकत दारात तुझी आठवण आली

No comments:

Post a Comment