तूझी वाट पाहणे
ही वेगळीच बात आहे ... |
तूझा विरहातही
तूझ्या आठवांची साथ आहे..|
आठवण म्हणजे..;
सतत विचारात तूझ येण असत.
का आठवण म्हणजे,
तू न मागताही
तूला बरच काही देण असत ...
आठवण म्हणजे;
तूझं मन
आपोआप मला कळणं असत
की एक नातं
आपल्या मनाचे
ऎकमेकांशी जूळणं असत
केव्हातरी मग
मन माझ होते अलवार
शब्दांकडे उघडते मग
माझ्या आठवांचे दार
मी मग होत जातो
एकटाच भरभरून व्यक्त
आणि समोरचे सारे विश्व
ऎकत असते माझ मन फ़क्त
अतातरी तुझ्या पावलांना
माझ्या दिलाचा रस्ता कळू देत
प्रेमाच्या नात्याने मग,
दोघांची ओंजळ अता भरू देत ..
No comments:
Post a Comment